30 C
Mumbai
Sunday, October 13, 2024
घरक्राईमनामापरळच्या केईएममध्ये पाच वर्षांच्या चिमुरडीवरील अतिप्रसंग टळला; एकाला अटक

परळच्या केईएममध्ये पाच वर्षांच्या चिमुरडीवरील अतिप्रसंग टळला; एकाला अटक

आरोपी कोणतेही काम करत नसल्याचे निष्पन्न

Google News Follow

Related

परळ येथील किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालयात पाच वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी २६ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पीडित मुलीच्या आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असताना आरोपीच्या एका नातेवाईकावर त्याच रुग्णालयात उपचार सुरू होते.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इरफान शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.पीडित मुलीच्या आई केईएम रुगणालयातील एका वॉर्डमध्ये दाखल होती आणि त्याच वॉर्डमध्ये आरोपीचा एक नातेवाईकही दाखल होता. मुलीचे कुटुंब ज्यामध्ये तिची आजी, भाऊ आणि बहीण होते, ते वॉर्डच्या बाहेर बसले होते. वॉर्डात असताना आरोपी इरफान खान (२६) आला आणि त्याने मुलीला काहीतरी खायला देण्याच्या नावाखाली तिचा हात पकडून तिला जिन्याजवळ घेऊन आला आणि त्या ठिकाणी तिच्यासोबत गैरवर्तन केले, या प्रकारामुळे घाबरलेली पीडित मुलगी जोरजोरात ओरडू लागली.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा मुलीने आरडाओरडा केला तेव्हा लोक जमा झाले आणि जेव्हा तिच्या आजीने तिला विचारले तेव्हा तिने सांगितले की, आरोपी खानने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला होता. या प्रकरणाची माहिती मिळताच पीडितेच्या आजीने भोईवाडा पोलिसात फिर्याद दिली.

हे ही वाचा:

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे तीनही टप्पे पूर्ण, सरासरी ६५ टक्के मतदान!

सहलीसाठी निघालेल्या शाळेच्या बसला आग, २४ जणांचा होरपळून मृत्यू!

तिरुपती लाडू प्रकरण; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपर्यंत सरकारकडून एसआयटी चौकशीला ‘फुल स्टॉप’

रेल्वे अपघात करण्याचा कट रचणाऱ्या दोघांना अटक

या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी बीएनएस कलम ७५ आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी इरफान खानला अटक केली. खान हा साकीनाका येथील रहिवासी असून तो कोणतेही काम करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. परळ येथील किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालयात पाच वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी २६ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पीडित मुलीच्या आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असताना आरोपीच्या एका नातेवाईकावर त्याच रुग्णालयात उपचार सुरू होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
182,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा