34 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरक्राईमनामाचंदीगढची पुनरावृत्ती? पवईतील मुलींच्या वसतिगृहातील बाथरूममध्ये डोकावणारा अटकेत

चंदीगढची पुनरावृत्ती? पवईतील मुलींच्या वसतिगृहातील बाथरूममध्ये डोकावणारा अटकेत

मुंबईतील आयआयटी मधील घटना

Google News Follow

Related

पवई येथील आयआयटी मध्ये असणाऱ्या मुलींच्या हॉस्टेलमधील बाथरूम मध्ये मुलींना आंघोळ करताना बघणाऱ्या २२ वर्षाच्या तरुणाला पवई पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणाजवळ असलेला मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो तपासणीसाठी कलिना येथील फॉरेन्सिक लॅब येथे पाठविण्यात आला आहे.चंदीगड मधील मुलींच्या व्हीडिओची घटना ताजी असताना मुंबईत घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडवून दिली आहे.

पिंटू गारिया (२२) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पिंटू हा आयआयटी मध्ये असणाऱ्या कँटीनमध्ये कंत्राटी कामगार आहे, मागील आठ महिन्यापासून तो कँटीनमध्ये काम करीत होता. रविवारी रात्री पिंटू हा मुलींच्या हॉस्टेलच्या इमारतीच्या मागे असणाऱ्या पाईप लाईनवर चढून पहिल्या मजल्यावरील बाथरूमच्या खिडकीतून मुलींना आंघोळ करताना बघत असताना एका मुलीचे लक्ष त्याच्याकडे जाताच तिने आरडाओरड केला.

हे ही वाचा:

ब्रह्मास्त्र थंड पडत चाललंय

उद्धव यांचा दसरा मेळावा म्हणजे पवार आणि सोनियांच्या मिश्र विचारांचा

‘पुष्पा’ एसटी झुकलेली, खचलेली

जपानमध्ये चक्रीवादळाचा कहर, लाखो लोक बेघर

 

तिचा आरडाओरड ऐकून हॉस्टेल मधील इतर कर्मचाऱ्यांनी १० क्रमांकाच्या हॉस्टेलच्या दिशेने धाव घेऊन पिंटूला ताब्यात घेतले आणि त्याला हॉस्टेलच्या अधिष्ठाता कार्यालयात आणण्यात आले. त्यानंतर पवई पोलिसांना याबाबत कळवून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिसांनी याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून पिंटू याला अटक केली आहे. त्याच्या जवळून मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे, पिंटूने मुलींचा आंघोळ करतानाचा मोबाईल मध्ये व्हिडीओ काढला असावा अशी शक्यता वर्तवली जात असली तरी त्याच्या मोबाईलमध्ये अद्याप असा व्हिडीओ मिळालेला नसून त्याने ते व्हिडीओ डिलीट केले असावे अशीही शक्यता वर्तवली जात आहे.पोलिसानी मोबाईल फोन हा तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅब कडे पाठवला असून तपास सुरू असल्याचे पोलीसानी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा