29.2 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरक्राईमनामापाकिस्तानशी लिंक असलेला जम्मू काश्मिरचा रहिवासी मुंबईत सापडला

पाकिस्तानशी लिंक असलेला जम्मू काश्मिरचा रहिवासी मुंबईत सापडला

सुरक्षा रक्षकाचे करत होता काम; मुंबई गुन्हे शाखेच्या CIUची कारवाई

Google News Follow

पाकिस्तानमधील मोबाइल क्रमांकावरून मुंबईतील एका रहिवाशाला धमकीचे व्हॉट्सॲप कॉल आणि व्हॉइस मेसेज पाठविल्याच्या प्रकरणाचा तपास करताना मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तवार्ता पथकाने (CIU) ४५ वर्षीय सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे. मोहम्मद शरीफ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो मूळचा जम्मू-काश्मीरचा रहिवासी आहे. गेल्या काही वर्षांपासून तो मुंबईत वास्तव्यास असून सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता.

मुंबईतील एका रहिवाशाला पाकिस्तानशी संबंधित मोबाइल क्रमांकावरून धमकीचे व्हॉट्सॲप कॉल तसेच व्हॉइस मेसेज आल्याने या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या CIUकडे सोपविण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी संबंधित पाकिस्तानस्थित मोबाइल क्रमांकाच्या वापरकर्त्याच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेण्यास सुरुवात केली.

तपासात मोहम्मद शरीफ हा पाकिस्तानमधील संबंधित व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर गुन्हे शाखेने शरीफचा मोबाइल फोन तपासला असता पाकिस्तानातील व्यक्तीसोबत झालेले संभाषण आणि इतर संपर्काचे पुरावे मिळाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी शरीफला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीनंतर त्याला औपचारिकरीत्या अटक करण्यात आली.

हे ही वाचा:

दिल्लीतील पीजी इमारत दुर्घटनेप्रकरणी मालकाला अटक

नेपाळमधील जलप्रलयानंतर चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला दणका

अमेरिकेत अमेझॉनच्या कार्गो विमानाचा अपघात; ५ जणांचा मृत्यू

मानस शिंदेने स्पर्धाविक्रमासह जिंकले सुवर्णपदक

दरम्यान, शरीफचे वडील पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) राहत असल्याची माहिती तपासात समोर आल्याने प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे. शरीफचा पाकिस्तानातील संबंधित व्यक्तीशी नेमका काय संबंध आहे, त्यांच्यात कोणत्या स्वरूपाचा संपर्क होता आणि धमकीचे कॉल व व्हॉइस मेसेज प्रकरणात शरीफची प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष भूमिका होती का, याचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.

शरीफ आणि पाकिस्तानातील व्यक्तीमधील संभाषणाचा आशय, संपर्काची वारंवारता, कॉलची माहिती तसेच मोबाइलमधील अन्य डिजिटल पुरावे तपासले जात आहेत. धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख आणि त्यामागील नेमका उद्देश काय होता, याचाही शोध घेतला जात आहे. शरीफचा या धमकीच्या घटनेशी थेट संबंध आहे की त्याचा केवळ पाकिस्तानस्थित व्यक्तीशी संपर्क होता, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी यंदा १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट या कालावधीत एकूण गुन्ह्यांपैकी सुमारे ८५ टक्के गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. गेल्या सहा वर्षांतील या कालावधीतील ही सर्वोत्तम कामगिरी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये सुमारे चार टक्क्यांची घट झाली असून, सायबर फसवणुकीतील रक्कम वसूल करणे आणि अमली पदार्थविरोधी कारवायांमध्येही पोलिसांना महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा