मुंबईत गणेश दर्शनासाठी आलेल्या जपानी दूतावासातील अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हातातील पर्स चोरून पळून गेलेल्या चोराचा शोध घेऊन २४ तासांच्या आत त्याला पायधुनी परिसरातून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी बुधवारी केली.
मोहम्मद अरबाज अब्दुल सत्तार सिद्दीकी असे आरोपीचे नाव आहे. मोहम्मद हा पायधुनी परिसरात राहण्यास असून त्याच्यावर बॅग लिफ्टिंगचे अनेक गुन्हे दाखल आहेत. जपानी दूतावासातील अधिकाऱ्याची पत्नी सयुरी तोशिहिरो गणेश दर्शनासाठी ही दिवसांपूर्वी मुंबईत आलेल्या आहेत. मलबार हिल येथे राहणारे जपान वाणिज्य दूतावासातील अधिकारी हे पत्नीसोबत हॉटेल ताज मध्ये आले होते. हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर हे जोडपे श्रीगणेशाचे दर्शन घेतल्यानंतर हॉर्निमन सर्कलमध्ये आले.
हे ही वाचा:
मायलेकीवर चाकूने हल्ला करून ३० वर्षीय इसमाची आत्महत्या
भारताचा कॅनडाला दणका; व्हिसा सेवा स्थगित
ओंकारेश्वरला उभी राहिली आदि शंकराचार्यांची भव्य मूर्ती !
स्वित्झर्लंडमध्ये बुरख्यावर बंदी !
दरम्यान एका मोटारसायकल वरून आलेल्या दोन जणांपैकी मागे बसलेल्या एकाने सयुरी यांच्या हातातील पर्स खेचून पळ काढला. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस तात्काळ कामाला लागले व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी एका आरोपीची ओळख पटविण्यात आली व बुधवारी रात्री मोहम्मद अरबाज अब्दुल सत्तार सिद्दीकी याला अटक करण्यात आली असून त्याच्याजवळून चोरलेली बॅग हस्तगत करण्यात आली आहे. त्यात ११ हजार रुपये, कागदपत्रे, ओळखपत्रे होती.







