गिरगाव सेक्स रॅकेटमधून मराठी, बंगाली अभिनेत्रींची सुटका

पोलिसांनी केला पर्दाफाश, महिला मेकअप आर्टिस्टला पकडले

गिरगाव सेक्स रॅकेटमधून मराठी, बंगाली अभिनेत्रींची सुटका

गिरगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन अभिनेत्रींची सुटका केली असून, त्यापैकी एक मराठी तर दुसरी बंगाली चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका ४० वर्षीय मेकअप आर्टिस्टला अटक केली आहे.

गिरगाव येथील हॉटेलमध्ये अनैतिक देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या युनिट ४ आणि क्राईम इंटेलिजन्स युनिटला (CIU) मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून हॉटेलवर धाड टाकली. या कारवाईत देहविक्रीसाठी सक्ती केली जात असलेल्या दोन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली. यातील एक अभिनेत्री मराठी मालिकांमध्ये काम करते, तर दुसरी बंगाली चित्रपटसृष्टीतील आहे.

हे ही वाचा:

आयुष मलिक बनला होता मोहम्मद अली; स्वेच्छेने पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला

“पाण्याच्या हक्कावर दावा करणाऱ्यांचे हात तोडू” पाक मंत्र्याची भारताला धमकी

“मोदी झोपत नाहीत”; राजदूत सर्जिओ गोर यांनी सांगितला ट्रम्प यांचा किस्सा

बांगलादेशचा पायावर धोंडा भारताला ऑफर देण्याची सूचना होती, दिली चीनला…

पोलिसांनी या प्रकरणात भिवंडी येथील रहिवासी असलेल्या शिफा अमजद अली खान (४०) या मेकअप आर्टिस्टला अटक केली आहे. ती या रॅकेटमध्ये एजंट म्हणून काम करत असल्याची शक्यता आहे. व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

छाप्यादरम्यान पोलिसांनी ५०० रुपयांच्या नोटा जप्त केल्या असून, त्या सापळ्याचा भाग होत्या. हे रॅकेट किती मोठे आहे आणि यात आणखी कोणाचे हात गुंतलेले आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच, हॉटेल व्यवस्थापनाची या प्रकारात काही संमती होती का, याचीही कसून चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Exit mobile version