29.8 C
Mumbai
Saturday, October 10, 2026
घरदेश दुनिया“मोदी झोपत नाहीत”; राजदूत सर्जिओ गोर यांनी सांगितला ट्रम्प यांचा किस्सा

“मोदी झोपत नाहीत”; राजदूत सर्जिओ गोर यांनी सांगितला ट्रम्प यांचा किस्सा

मोदी-ट्रम्प मैत्री आणि व्यापार करार; सर्जिओ गोर यांच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा

Google News Follow

Related

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वैयक्तिक मैत्री किती दृढ आहे, याचा एक रंजक किस्सा अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी सांगितला आहे. ट्रम्प यांनी एकदा सकाळी भारतात ६ वाजले असतानाच पंतप्रधान मोदींशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी वेळेची आठवण करून दिल्यावर ट्रम्प यांनी, “मोदी झोपत नाहीत, ते माझ्यासारखेच आहेत,” असे उत्तर दिल्याचे गोर यांनी सांगितले. सर्जिओ गोर यांनी हा अनुभव यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम (USISPF) लीडरशिप समिटमध्ये बोलताना सांगितला.

यावर्षी एप्रिलमध्ये अमेरिकेतील मियामी येथे आयोजित UFC 327 कार्यक्रमाच्या बॅकस्टेजमध्ये ते राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत होते. त्यावेळी ट्रम्प यांनी अचानक, “चला, पंतप्रधान मोदींना फोन करूया,” असे सांगितले. गोर यांनी त्यांना भारतात त्या वेळी सकाळचे ६ वाजले असल्याची आठवण करून दिली. मात्र ट्रम्प यांनी तत्काळ उत्तर दिले, “ते (मोदी) उठलेलेच असतील. ते माझ्यासारखेच आहेत. ते झोपत नाहीत.”

गोर यांनी सांगितले की, ट्रम्प यांना काही वेळातच कार्यक्रमात मंचावर जायचे असल्याने त्यावेळी फोन होऊ शकला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन्ही नेत्यांमधील संभाषणाचे नियोजन करण्यात आले. या प्रसंगाचा उल्लेख करताना गोर म्हणाले, “या गोष्टीतून मोठा संदेश असा मिळतो की, जेव्हा एखादी व्यक्ती तुमची खऱ्या अर्थाने मित्र असते, तेव्हा प्रत्येक गोष्ट आधी वेळ ठरवूनच करावी लागते असे नसते. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पंतप्रधान मोदींना खरोखरच आपला मित्र मानतात.”

हे ही वाचा:

जून महिन्यात मंदावलेला मान्सून वेग धरणार; अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

आयुष मलिक बनला होता मोहम्मद अली; स्वेच्छेने पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला

“पाण्याच्या हक्कावर दावा करणाऱ्यांचे हात तोडू” पाक मंत्र्याची भारताला धमकी

स्वदेशी ‘गगन’च्या सहाय्याने इंडिगोच्या जेटचे पहिले यशस्वी लँडिंग! काय आहे तंत्रज्ञान?

सर्जिओ गोर यांनी सांगितले की, ट्रम्प यांच्या मनात भारताबद्दल विशेष आदर आहे आणि ते पंतप्रधान मोदींना इतर अनेक जागतिक नेत्यांपेक्षा वेगळ्या नजरेने पाहतात. “काही नेत्यांसोबत भेटी आणि संवादासाठी वेळ ठरवावी लागते. मात्र पंतप्रधान मोदींबाबत ट्रम्प यांचे वेगळेच नाते आहे. ते त्यांना मित्र मानतात,” असे गोर यांनी स्पष्ट केले. तसेच ट्रम्प आजही आपल्या भारत दौऱ्याच्या आठवणी आवर्जून काढतात आणि भविष्यात पुन्हा भारताला भेट देण्याची त्यांची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात

याच कार्यक्रमात गोर यांनी भारत-अमेरिका व्यापार कराराबाबतही महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दोन्ही देशांमधील व्यापार करार जवळपास पूर्ण झाला असून केवळ शेवटच्या काही मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. “कराराचे सुमारे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. फक्त काही मुद्द्यांवर दोन्ही बाजूंनी सहमती होणे बाकी आहे,” असे त्यांनी सांगितले. करार लवकरच अंतिम होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा