27.6 C
Mumbai
Wednesday, July 1, 2026
घरराजकारणअहिर शिंदेंकडे आले, आदित्य ठाकरेंचा पराभव निश्चित

अहिर शिंदेंकडे आले, आदित्य ठाकरेंचा पराभव निश्चित

आमदार अतुल भातखळकर यांचे वक्तव्य

Google News Follow

Related

उबाठा शिवसेनेचे आमदार सचिन अहीर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे. आता सचिन अहीर यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सचिन अहीर यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे उद्धव ठाकरेंच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. केवळ शिव्यांची लाखोली वाहून काहीही होत नाही.

आमदार भातखळकर काय म्हणाले की, उबाठाचे नेते, प्रवक्ते लोकांना शिव्यांची लाखोली वाहात आहेत. नाही नाही ते शब्द वापरत आहात. त्यांच्या घरात काय चाललंय हेच त्यांना माहीत नाही. कुठे तुम्ही मुख्यमंत्री, पंतप्रधान याविषयी बोलत आहात? उरलासुरला पक्ष तर सांभाळा, आता यवतमाळमध्ये सभा घेतली तिथले लोक फुटले. आता वरळी विधानसभेतले नेते सचिन अहीरच शिंदेंकडे आले आहेत. याचा अर्थ आदित्य ठाकरेंचा वरळी विधानसभेतला २०२९च्या निवडणुकीतला पराभव हा १०० टक्के निश्चित.

हे ही वाचा:

टोमॅटो-कांद्याने वाढवली महागाईची धास्ती

प्रचंड लाटा, जोरदार वाऱ्यांच्या तडाख्यात अडकली बोट, ६ मच्छिमार वाचले

स्वदेशी ‘गगन’च्या सहाय्याने इंडिगोच्या जेटचे पहिले यशस्वी लँडिंग! काय आहे तंत्रज्ञान?

युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांनी रशियाला इंधन संकटात ढकलले

आमदार भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली की, हा अचानक धक्का नाही. त्यांच्याकडे काय खदखद काय आहे हे त्यांना माहीत नाही. वडील आणि मुलगा हे किती अकार्यक्षम आहेत, हे दिसते. जे पक्षाकडे, कार्यकर्त्यांकडे, आमदारांकडे किती दुर्लक्ष करतात याची चर्चा सातत्याने सुरूच असते. त्यातलाच हा पुढचा प्रकार आहे. त्यांचा व्यवहार धड नाही. आमदारांचे प्रश्न असतात, पण केवळ अहंकाराने, द्वेषाने वागायचे हा त्यावरचा मार्ग नसतो.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
318,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा