27 C
Mumbai
Thursday, January 8, 2026
घरक्राईमनामालाखभर रुपये घेऊन विकत होते प्रमाणपत्र; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

लाखभर रुपये घेऊन विकत होते प्रमाणपत्र; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Google News Follow

Related

देशातील विविध विद्यापीठ, शिक्षण संस्था यांची बनावट गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे विक्री करणाऱ्या टोळीवर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील बोरिवली येथे ही कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. प्रितेश जैन (३४) आणि रविप्रकाश मोर्या (२६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून छपाईसाठी लागणारे साहित्य, गुणपत्रिका जप्त केले आहे.

बोरिवली पूर्वेकडील नॅशनल पार्क समोर असलेल्या प्राईम सफायर एज्युकेशन या कार्यालयातील दोघांनी एका विद्यार्थ्याकडून १ लाख ३१ हजार रुपये घेतले. त्याबदल्यात हे दोघे त्याला मध्यप्रदेश येथील डॉ. ए. पी. जे कलाम विद्यापीठ आणि गुजरात येथील साबरमती विद्यापीठातील मागील वर्षीच्या पदवीच्या गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र देणार होते. अशा प्रकारे गरजू विद्यार्थ्यांकडून रोख आणि ऑनलाइन स्वरूपात पैसे स्वीकारून विविध नामांकित विद्यापीठांच्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र यांची विक्री केली जात असल्याची माहिती सहायक निरीक्षक भरत घोणे यांना मिळाली.

प्रभारी पोलिस निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ११ च्या पथकाने कारवाई करत प्रितेश आणि रविप्रकाश यांना ताब्यात घेतले. कार्यालयाची झडती घेतली असता या ठिकाणी २०० विद्यार्थ्यांच्या बनावट गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र आढळून आले. याचबरोबर एक लाखाची रोख रक्कम, पेनड्राइव्ह, लॅपटॉप, दोन हार्ड डिस्क आणि इतर कागदपत्रे सापडल्याची माहिती पोलिस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांनी दिली. अरुणाचल प्रदेश, मणिपूर, दिल्ली, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, छत्तीसगढ गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, जयपूर, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यातील विद्यापीठांची बनावट प्रमाणपत्र हे विकत असल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा:

नस्ती ‘किटकॅट’; चॉकलेटवर भगवान जगन्नाथाचा फोटो

धक्कादायक! माजी सरपंचाने गर्भवती वनरक्षकाला केली मारहाण

वैद्यकीय अभ्यासक्रमात २७ टक्के ओबीसी आरक्षणाला ‘सर्वोच्च’ पाठिंबा

‘१९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपी पाकिस्तानचे होते पाहुणे’

बनावट प्रमानपत्रासोबतच हे आरोपी विद्यार्थ्यांची जुन्या वर्षातील हजेरी लावून देत होते. काही विद्यापीठांमध्ये एक दिवसांसाठी नेऊन त्यांनी विद्यार्थ्यांकडून एकाच दिवसात तीन वर्षांचे पेपर सोडून घेतल्याचे चौकशीतून उघड झाले आहे. त्यामुळे यामध्ये विविध विद्यापीठांतील कर्मचाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पोलिस तपास करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा