25 C
Mumbai
Monday, March 2, 2026
घरक्राईमनामापुण्यात गाड्या फोडत होता सुलतान शेख; पोलिस अधिकारी रवींद्र कदम यांनी काढली...

पुण्यात गाड्या फोडत होता सुलतान शेख; पोलिस अधिकारी रवींद्र कदम यांनी काढली धिंड

२२ गुन्हे नावावर

Google News Follow

Related

गाड्यांच्या काचा फोडणे, दुचाकी गाड्या खाली पाडणे, त्यांची तोडफोड करणे अशा कृत्यातून पुण्यात दहशत माजवणाऱ्या २० वर्षीय सुलतान रिझवान शेख याला पोलिसांनी पकडून यथेच्छ चोप दिला. नंतर त्याची धिंड काढण्यात आली. लोकांसमोर पोलिसांनी त्याला उभे करून त्याचा सगळा दहशतीचा इतिहासच मांडला. लोकांनीही त्याची सुलतान हिजडा म्हणत हुर्यो उडविली.

अशा गुन्हेगारांना त्यांची ‘लायकी’ दाखवून देणारी अत्यंत कडक कारवाई येरवडा हद्दीतील लक्ष्मी नगर पोलिसांनी केली आहे. २० वर्षीय सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळून पोलिसांनी तब्बल २२ गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. विशेष म्हणजे, ज्या परिसरात त्याने गाड्या फोडून दहशत माजवली होती, त्याच रस्त्यावरून पोलिसांनी त्याची ‘धिंड’ काढली. त्यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.

हे ही वाचा:

वॉर्नर ब्रदर्स–पॅरामाउंटचा ऐतिहासिक करार

अंधेरीतील हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

GDP रीसेटनंतर भारताची झेप! FY26 मध्ये विकासदर ७.६ टक्क्यांवर

सकाळी उठल्यावर सांधे जकडतात?

सुलतान रिजवान शेख (वय २०, रा. लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) असे या अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आल्यानंतर त्याने २२ गुन्हे केल्याची कबुली दिली.

अशा गुन्ह्यातून निर्माण करण्यात येणाऱ्या दहशतीला संपुष्टात आणण्यासाठी पोलिसांनी सुलतानला घटनास्थळी नेऊन त्याची वरातच काढली. मान खाली घालून सदर आरोपी उभा होता. त्याला पोलिसांनी आपल्या दंडुक्याचा योग्य प्रसादही दिला होता. अशा गुन्हेगाराची वरात काढल्यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे. विशेषतः पोलिस अधिकारी रवींद्र कदम व्हीडिओत या गुन्हेगाराची पार्श्वभूमी, त्याने केलेल्या कृत्यांचा पाढा वाचताना दिसतात. त्यामुळे लोक त्यांचे कौतुक करत आहेत. या कामगिरीनंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वासही सोडला आहे.

या कारवाईबाबत बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. “गुन्हेगारांना आणि टवाळखोरांना घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासन सामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. परिसरात असा कोणताही प्रकार आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधा.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा