मुंबई पोलिस दलाला शरमेने मान खाली घालव
णारी घटना सोमवारी मुंबईत घडली आहे.मुंबई पोलीस दलातील ५३ वर्षीय सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हा अधिकारी मुंबई सेंट्रल येथील मैदानात बसलेल्या १८ वर्षीय दिव्यांग तरुणीसोबत अश्लील कृत्य करीत असताना नागरिकांना आढळून आला.नागरिकांनी या नराधम पोलिसाच्या तावडीतून तरुणीची सुटका करून त्याला चोप देत ताडदेव पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
ताडदेव पोलिसांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला,मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायाल
याने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संजय राणे (५३) असे आरोपी नाव असून तो सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर मुंबई पोलीस दलाच्या ताडदेव सशस्त्र विभागात आहे. कांदिवली चारकोप येथे राहणारे राणे हे सोमवारी सायंकाळी कामावरून सुटल्यावर पोलीस गणवेशात घरी जाण्यासाठी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाकडे निघाले होते, दरम्यान ताडदेव आरटीओकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या बीएमसीच्या भाऊसाहेब हिरे उद्यानात संजय राणे हे गेले.हे उद्यान सायंकाळच्या वेळेत कुटुंबीय, महिला आणि लहान मुलांनी गजबजलेले होते.
हे ही वाचा:
मालवणीतील जमलेले मुस्लीम बंगाली की बांगलादेशी?
२४ डिसेंबर : विश्वनाथन आनंद पहिल्यांदा विश्वविजेते ठरले
सुनील गावस्करांशी संबंधित कंटेंट हटवण्याचे निर्देश
चिन्नास्वामी स्टेडियमवर दिल्ली–आंध्र प्रदेश सामना प्रेक्षकांविना
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस वर्दीत असलेला पोलिस एका तरुणीसोबत बसलेला होता. काही वेळानंतर त्याने तिच्याशी अश्लील चाळे करत गैरवर्तन सुरू केल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.
हा प्रकार पाहून परिसरातील नागरिकांनी एकत्र येत त्या पोलिस कर्मचाऱ्याला पकडले आणि संताप व्यक्त करत त्याला मारहाण केली. त्यानंतर ताडदेव पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच ताडदेव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.
संबंधित पोलीस अधिकारी याचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अहवालानंतर तो नशेत होता का? हे तपासात समोर येईल असे ताडदेव पोलिस ठाण्यातील एका अधिकारी यांनी सांगितले, प्राथमिक तपासावरून आरोपी पोलिस अधिकारी हा नशेत नसावा आणि त्याच्या मानसिक आजारी असण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी वैद्यकीय अहवालानंतर समोर येईल असे अधिकारी यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्या उद्यानाच्या अगदी शेजारीच पोलिस चौकी आहे. या घटनेमुळे ताडदेव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात संबंधित तरुणी दिव्यांग असल्याचे स्पष्ट झाले आहे. अटक करण्यात आलेला सहाय्यक पोलिस निरीक्षक सशस्त्र पोलिस दलाशी संबंधित असून सध्या एल विभाग–२ मध्ये कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी ताडदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.







