नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबर २०२५ च्या रात्री मुंबईच्या रस्त्यांवर उतरलेल्या उत्साही वाहनचालकांवर मुंबई वाहतूक विभागाने कारवाईचा बडगा उगारून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १३ हजार चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.तसेच मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्या २११ तळीरामावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
मुंबईत थर्टी फर्स्ट रात्री कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच अपघात टाळण्यासाठी मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलीस मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते.
मुंबई शहरात वाहतूक नियमांचे पालन व्हावे आणि अपघात टाळले जावेत, यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली होती. शहरातील प्रमुख चौक, प्रवेशद्वारे आणि गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नाकाबंदी करण्यात आली होती.
हे ही वाचा:
पानाच्या सेवनाचे सात मोठे फायदे
नववर्षाची मिठाई दिली; नंतर प्रेयसीने प्रियकराच्या गुप्तांगावर केला वार
२०२६ : क्रिकेटसाठी जागतिक स्तरावर निर्णायक ठरण्याची चिन्हे
डिजिटल पेमेंटमध्ये भारताची मोठी झेप
या मोहिमेत ‘ब्रेथ अॅनालायझर’चा वापर करून मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांची (ड्रंक अँड ड्राईव्ह) तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण २११ वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत आढळल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मद्यप्राशनासोबतच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही ई-चलनद्वारे मोठी कारवाई करण्यात आली. विना हेल्मेट दुचाकी चालवणे, सिग्नल तोडणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, विरुद्ध दिशेने गाडी चालवणे, विना परवाना वाहन चालवणे, ट्रिपल सीट आणि सीटबेल्ट न वापरणे अशा विविध कारणांसाठी १३,७५२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या सर्व कारवायांतून एकूण १ कोटी ३१ लाख १४ हजार ८५० रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे.







