27.9 C
Mumbai
Friday, October 30, 2026
घरक्राईमनामाअंधेरीतून ६६ लाखांचा 'हायड्रो गांजा' जप्त

अंधेरीतून ६६ लाखांचा ‘हायड्रो गांजा’ जप्त

साताऱ्यातील दोन तरुणांना बेड्या

Google News Follow

अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करत तब्बल ६६ लाख ३६ हजार रुपये किमतीचा ‘हायड्रो गांजा’ जप्त केला आहे. या प्रकरणी साताऱ्यातून गांजा विक्रीसाठी मुंबईत आलेल्या दोन तरुणांना एमआयडीसी पोलिसांनी रंगेहाथ बेड्या ठोकल्या आहेत. ओमकार राजेंद्र पवार (वय २८, रा. भाकरवाडी, कोरेगाव, सातारा) आणि पियुष मधूकर घोंगडे (वय २२, रा. वाठार स्टेशन, कोरेगाव, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रणजीत गोंदकुपे व अंमली पदार्थ विरोधी पथक २९ ऑक्टोबर रोजी रात्री हद्दीत गस्त घालत होते. पावणेआठच्या सुमारास पेपर बॉक्स रोडवरील जे. के. इंडस्ट्रियल इस्टेटजवळ दोन संशयित तरुण घुटमळताना पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांची गाडी पाहताच एकाने हातातील लाल रंगाची पिशवी लपवून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत दोघांनाही जागीच ताब्यात घेतले.

हे ही वाचा:

सोमनाथ मंदिर परिसरातील मांसाहार विक्रीवरील बंदी रद्द

अर्शदीपचा विकेट्सचा दीडशतकी धमाका!

नोव्हेंबरमध्ये करदात्यांसाठी महत्त्वाच्या डेडलाईन्स

ब्रेकअप केला म्हणून बलात्काराचा गुन्हा ठरणार नाही!

चौकशीदरम्यान दोघांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी पिशवीत अंमली पदार्थ असल्याची कबुली दिली. पोलिसांनी एनडीपीएस कायद्यानुसार पिशवीची झडती घेतली असता, त्यात १ किलो ८९६ ग्रॅम वजनाचा उच्च दर्जाचा ‘हायड्रो गांजा’ आढळून आला. आंतरराष्ट्रीय बाजारात या गांजाची अंदाजे किंमत ६६ लाख ३६ हजार रुपये इतकी आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार गौतम बडे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघे साताऱ्यातून हा साठा घेऊन मुंबईत नेमका कोणाला वितरीत करण्यासाठी आले होते, तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा हात आहे का, याचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा