34 C
Mumbai
Tuesday, March 10, 2026
घरक्राईमनामामागाठाणे मेट्रो स्टेशन परिसरातील ट्रक्सच्या त्रासावर पोलिसांनी उगारला दंडुका

मागाठाणे मेट्रो स्टेशन परिसरातील ट्रक्सच्या त्रासावर पोलिसांनी उगारला दंडुका

वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणवरे यांनी कारवाईचे दिले होते आदेश

Google News Follow

Related

मागाठाणे मेट्रो स्टेशनच्या परिसरात राहणाऱ्या लोकांची तेथील बांधकामांमुळे होत असलेली परवड, प्रदूषण, रहदारी, रस्त्यांची दुरवस्था यामुळे होणारा त्रास याबद्दल न्यूज डंकाने बातमी दिली होती. त्याची दखल घेत कस्तुरबा नगर पोलिस ठाण्याने त्या परिसरात उभ्या असलेल्या ट्रक्सवर कारवाई केलेली आहे.

याबाबत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराज रणवरे यांनी न्यूज डंकाला सांगितले की, त्यांनी १२२ मोटर व्हेईकल कायद्यानुसार कारवाई केलेली आहे. इथे गाड्या उभ्या करून त्यात लोडिंग अनलोडिंग करू नका, असे स्पष्ट निर्देशही रणवरे यांनी दिलेले आहेत. त्यामुळे आता या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल अशी आशा आहे.

यासंदर्भात न्यूज डंकाने बातमी देत नागरिकांच्या संतापाची दखल घेतली होती. तेव्हा वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणवरे यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. ती कारवाई अखेर त्यांनी केली.

हे ही वाचा:

गाझा- इजिप्तमधील रफाह क्रॉसिंग अंशतः उघडले

‘क्रिटिकल मिनरल्स’ परिषदेसाठी एस जयशंकर अमेरिकेला रवाना

AI सेमीकंडक्टरचा शंखनाद!

अर्थसंकल्पात कृत्रिम बुद्धिमत्तेला प्राधान्य

मागाठाणे मेट्रो स्टेशनच्या परिसरात अनेक ठिकाणी इमारतींची बांधकामे सुरू असल्यामुळे रस्त्यावर उभे ट्रक, त्यामुळे उडणारी धूळ, या सततच्या अवजड वाहनांच्या रहदारीमुळे, त्यातून उतरवले जाणारे सामान, चढवले जाणारे सामान तसेच  रस्त्यांची झालेली दुरवस्था यामुळे लोक चिडलेले आहेत. लोकांनी यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या.

या मेट्रो स्टेशनच्या बाजूला असलेल्या जोड रस्त्यावर रोज मिक्सर, अवजड सामानाने भरलेले ट्रक उभे असल्यामुळे त्या रस्त्यावर चालणेही मुश्किल होत असल्याची लोकांची तक्रार होती. इतर वाहनेही त्याच रस्त्यावरून धावत असतात. परिणामी, अपघात होण्याची शक्यता असते. फुटपाथवरून चालणेही अशक्य असते. तिथेही आसपास चाललेल्या कामासाठी नेमलेले सुरक्षा रक्षक बसलेले असतात शिवाय हा फुटपाथ इतका चिंचोळा आहे की तिथून दोन माणसे एकाचवेळी व्यवस्थित जाऊ शकत नाहीत, यामुळे लोक त्रस्त होते. पण आता पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
297,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा