28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरक्राईमनामाबलात्कार प्रकरणातील आरोपी प्रज्ज्वल रेवण्णा भारतात आला; तात्काळ केली अटक

बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रज्ज्वल रेवण्णा भारतात आला; तात्काळ केली अटक

आवाजाचे नमुने तपासले जाणार, एसआयटीच्या ताब्यात

Google News Follow

Related

कर्नाटकातील हासन मतदारसंघातील खासदार प्रज्ज्वल रेवण्णा याला बलात्कार आणि लैंगिक शोषण संदर्भात शुक्रवारी अटक करण्यात आली. बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर तो जर्मनीहून दाखल झाल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी त्याला पहाटे अटक केली.

इंटरपोलने तो जर्मनीहून भारतात येत असल्याचे सांगितल्यानंतर कर्नाटक पोलिस, बेंगळुरू पोलिस आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याच्या अटकेची तयारी केली. विशेष तपास पथकाने त्याला कोठडीत नेले आहे. एप्रिल २७ ला रेवण्णाने भारत सोडला होता. हासन येथील लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यावर तो रवाना झाला होता.

गुरुवारी इंटरपोलकडून माहिती मिळाली की, रेवण्णाने म्युनिकमधून लुफ्तान्सा एअरलाइन्सचे विमान पकडले आहे. विशेष तपास पथकाने केलेल्या विनंतीनंतर इंटरपोलने त्याच्याविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस बजावली होती.

शुक्रवारी मध्यरात्री १२.४९ वाजता प्रज्ज्वल बेंगळुरू विमानतळावर दाखल झाला. शुक्रवारी ३१ मे रोजी आपण १० वाजता विशेष तपास पथकासमोर उपस्थित असू असे त्याने म्हटले होते. बुधवारी त्याने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. न्यायालयाने त्याची सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलली.

हे ही वाचा:

मोदींसोबत, केतकरांनाही हॅट्रीकची संधी…

…आणि अचानक मनमोहन सिंग जागे झाले!

जम्मू-काश्मीरमधील अखनूरमध्ये बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू!

कारसेवक देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत घेतले रामललांचे दर्शन!

विशेष तपास पथकाने सांगितले आहे की, त्याला प्रथम इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या ताब्यात तो होता त्यांनी त्याची सगळी कागदपत्रे तपासल्यानंतर त्याला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले.

आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर झाल्यानंतर प्रज्ज्वलविरोधात कर्नाटक सरकारने २८ एप्रिलला एसआयटी नियुक्त केली. या व्हिडिओमध्ये त्याने महिलांवर अत्याचार केल्याचे दिसत आहे. एसआयटी त्याच्याविरोधातील तीन प्रकरणांचा तपास करणार आहे. बुधवारी एसआयटीने प्रज्ज्वलच्या घरातील बेड, लाकडी फर्निचर ताब्यात घेतले आहे. त्याच्या आवाजाचे नमुनेही घेण्यात येणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा