28.9 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरक्राईमनामामुलाच्या हव्यासापोटी गरोदर बायकोला केली मारहाण; नंतर दिला तलाक!

मुलाच्या हव्यासापोटी गरोदर बायकोला केली मारहाण; नंतर दिला तलाक!

Google News Follow

मेरठच्या लिसाडी गेट पोलीस स्टेशन परिसरात एका तांत्रिक मांत्रिक करणाऱ्या इसमाने  मुलाच्या हव्यासापोटी स्वतःच्या गरोदर पत्नीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

या तांत्रिकाने गरोदरपणात पत्नीवर अत्याचार केला. तांत्रिक पतीला त्याच्या तांत्रिक कृत्याने मुलगा हवा होता, मात्र मुलाऐवजी मुलगी झाली. त्यानंतर संतापलेल्या तांत्रिकाने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि तिहेरी तलाक देऊन तिला घराबाहेर हाकलून दिले. पत्नीने कुटुंबीयांसह लिसाडी गेट पोलिस ठाणे गाठून तक्रार देऊन कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

लिसाडी गेट परिसरात राहणाऱ्या फराहचा विवाह तीन वर्षांपूर्वी तांत्रिक बाबा फरीद खान उर्फ ​​राजासोबत झाला होता, त्यानंतर पतीने फराहचा हुंड्यासाठी छळ सुरू केला. इतकंच नाही तर फराह गरोदर असतानाच तांत्रिकाने मुलगा होण्यासाठी तिच्यावर तांत्रीक कारवाई सुरू केली. गरोदरपणात पतीने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे.

हे ही वाचा:

नाना पटोलेंचे आंदोलन पोलिसांनी गुंडाळले

‘काँग्रेसचे आंदोलन म्हणजे नाना पटोलेंची नौटंकी’

‘राहुल गांधी हे आधुनिक काळातील मोहम्मद अली जिना’

काँग्रेसचे आंदोलन; भाजपा कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

जेव्हा एवढे तांत्रिक कृत्य करूनही मुलगी झाली तेव्हा त्याने तिच्यावर आणखी अत्याचार करायला सुरवात केली. मुलगी झाल्यामुळे संतापलेल्या तांत्रिक पतीने फराहला मारहाण केली आणि तिहेरी तलाक देऊन तिला घरातून हाकलून दिले. मग ही फराह तिच्या मुलीसह आई- वडिलांकडे गेली आणि तिने झालेल्या प्रकार सांगितला.

यानंतर फराहचे मामा आणि बाबा तांत्रिकाच्या घरी पोहोचले, मात्र तांत्रिकाने फराहच्या वडिलांनाही बेदम मारहाण केली आणि लोखंडी रॉडने त्यांचे डोके फोडले. कुटुंबीयांनी फरहाला घेऊन पोलिस ठाणे लिसाडी गेट गाठले आणि कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे  त्याचवेळी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून याप्रकरणी पोलीस कायदेशीर कारवाई करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा