24 C
Mumbai
Saturday, January 24, 2026
घरक्राईमनामानववर्षाचा पहिला दिवस ठरला शेवटचा! चाकूचे वार करत पुजाऱ्याचा खून

नववर्षाचा पहिला दिवस ठरला शेवटचा! चाकूचे वार करत पुजाऱ्याचा खून

Google News Follow

Related

गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्ष च्या पहिल्या दिवशी अंबाजोगाई मध्ये एका मंदिर पुजाऱ्याच्या खुनाने खळबळ उडाली आहे. भर दिवसा या पुजाऱ्याची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंबाजोगाई शहराला लागून असलेल्या शेवपाडी येथे एका हनुमानाच्या मंदिरात संतोष दासोपंत पाठक हे पुजारी म्हणून कार्यरत होते. शनिवार, २ एप्रिल रोजी दुपारी १ च्या सुमारास चाकू भोसकून त्यांचा खून करण्यात आला.

संतोष पाठक शेवपाडी येथील हनुमान मंदिराचे पुजारी असून सोबतच गावातील इतर ग्रामस्थांच्या घरीही ते धार्मिक विधी करण्यासाठी जात असत. नववर्षाचा पहिला दिवस, त्यात शनिवार असल्यामुळे गावातील हनुमान मंदिरात भाविकांची रेलचेल होती. त्यामुळे सकाळपासूनच पाठक गुरुजी हनुमान मंदिरात होते. दुपारी १ वाजायच्या सुमारास एक माथेफिरू देवळात आला आणि त्याने संतोष पाठक यांच्यावर चाकूने हल्ला करायला सुरुवात केली. त्याने चाकूचे सपासप वार करून त्यांचा खून केला. यावेळी गावातील काही महिला मंदिरात उपस्थित होत्या. त्यांनी या हल्लेखोरांवर दगड मारून पाठक यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र हा हल्लेखोर वार करतच राहिला.

हे ही वाचा:

चेतक: राष्ट्रसेवेची ६० गौरवशाली वर्षे

गतविजेत्या इंग्लंडला धूळ चारत ऑस्ट्रलियन महिलांनी सातव्यांदा उचलला विश्वचषक

पवन एक्सप्रेसचे चार डबे रुळावरून घसरले, एक ठार

काश्मिरी पंडितांनी श्रीनगरमध्ये साजरा केला ‘नवरेह’ सण

ही घटना घडल्यानंतर तात्काळ गावकऱ्यांनी पुजारी पाठक यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले. पण तिथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आपला तपास सुरू केला आणि या माथेफिरू हल्लेखोराला अटक केली. पण यामुळे पुन्हा एकदा राज्यातील सर्वसामान्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा