25 C
Mumbai
Sunday, February 1, 2026
घरक्राईमनामादहशतवादी कारवायांमुळे काश्मीरमधून बडतर्फ केलेला प्राध्यापक अल फलाह विद्यापीठात नोकरीला

दहशतवादी कारवायांमुळे काश्मीरमधून बडतर्फ केलेला प्राध्यापक अल फलाह विद्यापीठात नोकरीला

डॉ. निसार-उल-हसन असे प्राध्यापकाचे नाव असून स्फोटाच्या घटनेनंतर फरार असल्याची माहिती

Google News Follow

Related

फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूल आणि दिल्ली बॉम्ब स्फोटाच्या संदर्भात अल फलाह विद्यापीठ चौकशीच्या केंद्रस्थानी आहे. तापसादरम्यान दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने बडतर्फ केलेला एक प्राध्यापक अल फलाह विद्यापीठात काम करत असल्याचे उघडकीस आले आहे. डॉ. निसार-उल-हसन असे या प्राध्यापकाचे नाव आहे. त्यांना २०२३ मध्ये जम्मू- काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी बडतर्फ केले होते. निसार अल फलाह विद्यापीठात औषध विभागात प्राध्यापक म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे.

अल-फलाह विद्यापीठातील औषध विभागातील प्राध्यापक डॉ. निसार-उल-हसन याला २०२३ मध्ये जम्मू- काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी बडतर्फ केले होते. सरकार राज्याच्या सुरक्षेशी संबंधित बाबींमध्ये विभागीय चौकशीशिवाय कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला बडतर्फ करू शकते. एनडीटीव्ही दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. निसार-उल-हसन हा बडतर्फ होण्यापूर्वी श्रीनगरमधील श्री महाराजा हरि सिंह रुग्णालयात औषध विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत होता. २१ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या आदेशात म्हटले आहे की, “तथ्ये आणि परिस्थिती विचारात घेतल्यानंतर आणि उपलब्ध माहितीच्या आधारे, उपराज्यपालांना खात्री आहे की डॉ. निसार-उल-हसन यांनी अशा क्रियाकलापांमध्ये सहभाग घेतला आहे ज्यामुळे त्यांना बडतर्फ करावे लागेल.”

जम्मू- काश्मीरमधून काढून टाकल्यानंतर डॉ. निसार-उल-हसन याला फरिदाबादमधील अल फलाह विद्यापीठात भरती करण्यात आले. त्याला विद्यापीठाच्या वैद्यक विभागात प्राध्यापक म्हणून नियुक्त करण्यात आले. २०१४ मध्ये स्थापन झालेले अल फलाह विद्यापीठ दहशतवादी संघटनांशी कोणत्याही संबंधांना नकार देते. अल फलाह विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आणखी एका डॉक्टरची चौकशी सुरू आहे. ही डॉक्टर एमबीबीएसची विद्यार्थिनी असून डॉ. निसार याची मुलगी आहे. दिल्ली बॉम्बस्फोटापासून डॉ. निसार फरार आहे. बॉम्बस्फोटांचे अनेक दुवे हे केवळ अल फलाह विद्यापीठात सापडत आहेत. तपास संस्था सर्व बाजूंनी विद्यापीठाच्या निधीची चौकशी करत आहेत.

हे ही वाचा:

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरण: ह्युंडाई आय२० सोबत आणखी एक लाल रंगांची गाडी होती?

डॉक्टरांच्या अटकेनंतर अल- फलाह विद्यापीठाने सोडले मौन; काय दिले स्पष्टीकरण?

दिल्ली कार स्फोट चौकशीसाठी एनआयएकडून विशेष पथकाची स्थापना

लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणाचे तुर्की कनेक्शन?

अल फलाह विद्यापीठात जम्मू- काश्मीरमधील अंदाजे २५० लोक आहेत. ज्यात विद्यार्थी, डॉक्टर आणि इतर विभागांचा समावेश आहे. फरिदाबाद येथील अल फलाह विद्यापीठाचा संबंध १० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाशी जोडला जात आहे. तिथे काम करणाऱ्या डॉ. शाहीन हिला आधीच अटक करण्यात आली आहे. तसेच आणखी सहा डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्लीत सोमवारी झालेल्या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला आणि जवळपास १२ हून अधिक जण जखमी झाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा