29 C
Mumbai
Friday, February 27, 2026
घरक्राईमनामागळा चिरला, पाय छाटले...महिला हत्याकांडाने राजस्थान हादरले

गळा चिरला, पाय छाटले…महिला हत्याकांडाने राजस्थान हादरले

Google News Follow

Related

राजस्थानमध्ये घडलेल्या भिषण हत्याकांडाने सारे राज्य हादरून गेले आहे. मंगळवार, १९ ऑक्टोबर रोजी जयपूर येथे दिवसा ढवळ्या हा धक्कादायक प्रकार घडला आहे. ज्यामध्ये महिलेचा गळा चिरून नंतर तिचे दोन्ही पाय छाटण्यात आले. या हल्ल्यात ही महिला जागीच मृत्युमुखी पडली आहे. तर महिलेच्या हत्येनंतर हल्लेखोर महिलेची सोन्याची चेन आणि अंगठ्या घेऊन पसार झाले आहेत. या प्रकरणात कुर्‍हाडीचा वापर करून या महिलेवर सपासप वार करण्यात आले.

फत्तेपूर गावात जमवारागड पोलीस स्थानकाच्या अखत्यारीत हा गुन्हा घडला आहे. पोलिसांचा सांगण्यानुसार फक्त चोरीच्या हेतूनेच या महिलेवर हल्ला करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार ही पीडित महिला सकाळी १० च्या सुमारास गाई म्हशींना घेऊन शेतात चरण्यासाठी गेली होती. पण बराच वेळ झाला तरीही ती परत आली नाही. दुपारच्या सुमारास शेताच्या बाजूने जाणाऱ्या काही गावकऱ्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली ही महिला दिसून आली. या गावकऱ्यांनी यासंदर्भात गावात कळवले.

हे ही वाचा:

जयंत पाटलांच्या शिक्षण संस्थेने सरकारचीच जमीन सरकारला देऊन तीसपट मोबदला मिळवला!

काँग्रेसच्या नव्या नियुक्त्यांत पटोले समर्थकांचे ‘लोंढे’; सचिन सावंतांचा नाराजीनामा

‘कॅप्टन’ काढणार स्वतःचा नवा ‘संघ’

उल्हासनगरमध्ये लोक छत्री घेऊन जात आहेत शौचालयात… वाचा काय आहे कारण?

दरम्यान या प्रकरणावरून राजस्थानचे राजकारण तापण्याची चांगलीच चिन्हे दिसत आहेत. राजस्थान मधील भाजपाचे राज्यसभा खासदार किरोडीलाल मीणा यांनी या घटनेवरून राजस्थान मधील काँग्रेस सरकार ताशेरे ओढले आहेत. तर यावेळी त्यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधींवरही निशाणा साधला आहे. ‘लडकी हूं, लढ सकती हूं’ म्हणणाऱ्या प्रियांका गांधी यांनी राजस्थान मधील या घटनेकडेही लक्ष द्यावे असे म्हटले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा