31 C
Mumbai
Thursday, December 11, 2025
घरक्राईमनामावलसाडमधील उंबरगावमध्ये तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; आरोपीच्या आवळल्या मुसक्या

वलसाडमधील उंबरगावमध्ये तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; आरोपीच्या आवळल्या मुसक्या

खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवणार असल्याची पोलिसांची माहिती

Google News Follow

Related

गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील उंबरगाव येथे एका तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त स्थानिकांनी पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती. दरम्यान, चिमुरड्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला वलसाडच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी त्याच्या मूळ गावी पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाचा त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

मंगळवार, २७ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास उंबरगाव येथील देवधाम परिसरातील चाळीमध्ये तीन वर्षे तीन महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. वलसाडचे पोलीस अधीक्षक करणराज वाघेला यांनी घटनेची गंभीर दखल घेऊन तत्काळ घटनास्थळ गाठले. पीडितेच्या पालकांनी तक्रार नोंदवल्यानंतर वलसाड जिल्हा पोलिसांच्या गुन्हे शाखेने, स्पेशल ऑपरेशन ग्रुपने महाराष्ट्र राज्यातून त्याच्या मूळ गावी पळून जाणाऱ्या आरोपीला काही तासांत पकडले.

हे ही वाचा:

रामेश्वरम कॅफे स्फोट घडवून आणणाऱ्या दहशतवादी घोरीचा भारतातील रेल्वे नेटवर्क उध्वस्त करण्याचा मनसुबा

दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट; मुंबई महानगर क्षेत्रात २३८ गोविंदा जखमी

मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांच्या नावे कुणीतरी मागितले ५०० रुपये!

…ते भाग्य स्वप्नीलच्या वाट्याला कधी येणार?

या कारवाईदरम्यान पीडित मुलीला तत्काळ वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना समजताच संतप्त स्थानिकांनी पोलीस ठाण्याच्या परिसरात जमण्यास सुरुवात केली होती. तसेच आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी लावून धरली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी करण्यासाठी वापीच्या पोलीस उपअधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच आरोपीविरुद्धच्या तपासादरम्यान वैज्ञानिक, न्यायवैद्यक, वैद्यकीय आणि परिस्थितीजन्य पुरावे मिळवून तत्काळ आरोपपत्र दाखल करून हा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालविला जाईल, असा विश्वास पोलिसांनी दिला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा