25 C
Mumbai
Saturday, January 31, 2026
घरक्राईमनामापश्चिम बंगालमध्ये पुन्हा बलात्काराची घटना, चार वर्षांची मुलगी अत्याचाराची बळी

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा बलात्काराची घटना, चार वर्षांची मुलगी अत्याचाराची बळी

ममता सरकारवर टीका

Google News Follow

Related

पश्चिम बंगालच्या हुगळी येथे एक चार वर्षांची मुलगी तिच्या पालकांच्या शेजारी झोपलेली असताना कथितरित्या अपहरण करण्यात आल्याचा आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये बलात्काराची आणखी घटना घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

पोलीसांनुसार, ही घटना शुक्रवारी तारकेश्वर रेल्वे स्थानकाजवळ घडली, जिथे पीडितेचे कुटुंब तात्पुरता आसरा घेत होते. दिलेल्या तक्रारीनुसार, मुलीला मच्छरदाणीखालून झोपेतून उचलून नेण्यात आले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला.

सकाळी मुलगी शेजारी नसल्याचे आढळताच परिसरात घबराट पसरली. तासन्‌तास शोध घेतल्यानंतर दुपारी मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत स्थानकाजवळील नाल्याशेजारी सापडली.

भाजपच्या अरामबाग जिल्हाध्यक्ष पार्ना अदक म्हणाल्या, “मुलगी तिच्या आजीच्या शेजारी मच्छरदाणीखाली झोपली होती. आरोपीने मच्छरदाणी कापून तिला उचलून नेले. अनेक तास शोध घेतल्यानंतर ती नाल्याजवळ आढळली — नग्न अवस्थेत, गालावर चावल्याच्या खुणा होत्या आणि शरीरावर रक्त. अनेक तास उपचार करूनही ती अजूनही जननेंद्रियांमध्ये रक्तस्त्राव होत आहे.”

पीडितेला तरकेश्वर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, जिथे प्राथमिक उपचार करून तिला सोडण्यात आले.कुटुंबाने आरोप केला की, रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी प्रकरणात निष्काळजीपणा केला. मुलगी रक्तस्त्राव होत असतानाही पोलिसांना त्वरित माहिती दिली नाही. नंतर कुटुंबाने पोलीस ठाण्यात गेल्यावर त्यांना बाहेर जाण्यास सांगितल्याचा आरोपही त्यांनी केला.

यानंतर पोलिसांनी मुलीला पुन्हा वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आणले. या घटनेनंतर भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयात आंदोलन केले व डॉक्टरांवर आणि पोलिसांवर निष्काळजीपणाचे आरोप केले.

हे ही वाचा:

जंगल जंगल बात चली है, पता चला है…राहुल गांधी मध्य प्रदेशात जंगल सफारीवर

बिहारमध्ये महिला मोठ्या संख्येने उतरल्या मैदानात

भारत २३ वर्ल्ड-क्लास रिफायनऱ्यांसह आता जगातील टॉप पाच रिफायनिंग देशांमध्ये

ॲपलने आपल्या डेव्हलपर वेबसाइटवर सुरू केला नवा विभाग

पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. त्यांनी X वर लिहिले,  तारकेश्वर येथे चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला. कुटुंब पोलिसांकडे गेले पण एफआयआर नोंदवला नाही! रुग्णालयात नेले तर तिथून चंदननगरला रेफर केले. तारकेश्वर पोलिस गुन्हा दडपण्यात व्यस्त आहेत. हे ममता बॅनर्जींच्या राजवटीचे खरे स्वरूप आहे. पोलिस कायद्याचे संरक्षण करत नाहीत, तर सरकारच्या प्रतिमेचे रक्षण करतात. ममता बॅनर्जी, आपण अपयशी मुख्यमंत्री आहात.”

दरम्यान, तारकेश्वरचे आमदार रमेंदू सिंग रॉय यांनी ही घटना “अत्यंत दुर्दैवी” असल्याचे सांगितले आणि रेल्वे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीवर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, “कुटुंब वैद्यकीय उपचारांबाबतच्या गैरसमजात पोलिस ठाण्यातून बाहेर गेले असावे; परंतु प्रशासनाने नंतर सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या.” या प्रकरणी POCSO कायद्यानुसार एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा