दिल्ली स्फोटातील आरोपी दहशतवादी डॉ. मुझम्मिलचे फरिदाबादमध्ये आणखी दोन लपण्याची ठिकाणे उघड झाली आहेत. त्याने एका माजी सरपंचाकडून घर भाड्याने घेतले होते. काश्मिरी फळे साठवण्याच्या नावाखाली त्याने ही खोली घेतली होती. तो शाहीनसोबत आला होता. दिल्ली बॉम्बस्फोटातील दहशतवादी मॉड्यूलचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दोन मोठे खुलासे केले आहेत. हे दोन्ही खुलासे अल- फलाह विद्यापीठाचे अटक केलेले डॉ. मुझम्मिल शकील याच्याबद्दल आहेत.
मुझम्मिल याने फरिदाबादमधील केवळ फतेहपूर तगा आणि धौजमध्येच नव्हे तर खोरी जमालपूर गावातही एक जागा भाड्याने घेतली होती. माजी सरपंच जुम्मा यांचे तीन बेडरूम, एक स्वयंपाकघर आणि एक हॉल असलेले घर काश्मिरी फळांचा व्यापार करण्याच्या उद्देशाने भाड्याने घेतले होते. मुझम्मिलने डॉ. शाहीन हिच्यासोबत या घरात अनेक वेळा भेट दिली होती.
तपासात असे दिसून आले की दहशतवादी मॉड्यूलने फतेहपुरा तगा आणि धौजमध्ये साहित्य लपवण्यापूर्वी विद्यापीठाजवळ स्फोटके साठवली होती. अल- फलाह विद्यापीठाशेजारील शेतातील एका खोलीत सुमारे १२ दिवसांपासून सुमारे २५४० किलो स्फोटके साठवून ठेवण्यात आली होती. चोरी किंवा सापडण्याची भीती असल्याने, ते नंतर फतेहपूर तागा गावातील इमाम इश्तियाक यांच्या जुन्या घरात हलवण्यात आले. येथे तयार केलेले स्फोटके दिल्ली स्फोटात वापरण्यात आली होती. सोमवारी रात्री, एनआयएने डॉ. मुझम्मिल याला ओळखण्यासाठी येथे आणले जोते. माजी सरपंच जुम्मा यांनी त्याला पाहिल्यानंतर ओळख पटवली.
एनआयएच्या तपासात असे दिसून आले की, डॉ. मुझम्मिल याने एप्रिल ते जुलै २०२५ पर्यंत अल- फलाह विद्यापीठापासून अंदाजे ४ किलोमीटर अंतरावर असलेले तीन बेडरूमचे घर ८,००० रुपये दरमहा भाड्याने घेतले. हे घर खोरी जमालपूर गावाचे माजी सरपंच जुम्मा यांचे आहे. डॉ. मुझम्मिल याने त्यांना सांगितले होते की, काश्मिरी फळांचा व्यापार करायचा असून त्यासाठी त्यांना अधिक जागेची आवश्यकता आहे. सुमारे अडीच महिन्यांनंतर, येथील उष्णता असल्याचे कारण देत त्यांनी खोली रिकामी केली.
हे ही वाचा..
हाँगकाँगमध्ये बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीत ४४ जणांचा मृत्यू; २७९ जण बेपत्ता
यूएस नॅशनल गार्डवरील हल्ला हे दहशतवादी कृत्य!
राम मंदिर ध्वजारोहणावर टिपण्णी करणाऱ्या पाकला फटकारलं; काय म्हणाला भारत?
‘वसुधैव कुटुंबकम’च्या भावनेने जगाचे स्वागत करण्यास सज्ज
जुम्मा म्हणाले की, जेव्हा मुझम्मिलने अपार्टमेंट भाड्याने घेतले तेव्हा त्याच्यासोबत एक महिला होती. त्याने त्या महिलेचे वर्णन कुटुंबातील सदस्य म्हणून केले. ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून अल-फलाह विद्यापीठाची डॉ. शाहीन सईद होती. चौकशीत असे दिसून आले की, तो अपार्टमेंट भाड्याने घेतल्यानंतर शाहीनसोबत अनेक वेळा भेट दिली होती.







