27 C
Mumbai
Monday, February 2, 2026
घरक्राईमनामाधक्कादायक! पती बरा व्हावा म्हणून सहा महिन्याच्या नातीचा दिला बळी

धक्कादायक! पती बरा व्हावा म्हणून सहा महिन्याच्या नातीचा दिला बळी

Google News Follow

Related

अंधश्रद्धेतून एका सहा महिन्याच्या मुलीचा प्राण गेल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. आजोबांची तब्येत बरी व्हावी म्हणून नातीला फिश टँकमध्ये बुडवल्याची माहिती आहे. तामिळनाडूतील पट्टुकोट्टई येथे ही घडली असून तहशीलदाराने या लहान मुलीच्या मृत्यूची बातमी पोलिसांना दिल्यावर हे प्रकरण समोर आले.

नसिरुद्दीन आणि शालीहा या दाम्पत्याला सहा महिन्यांची मुलगी होती. नसिरुद्दीन याचे काका कामानिमित्त परदेशात होते ते काही दिवसांपूर्वी नसिरुद्दीनच्या घरी परतले होते. या काकांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांच्या पत्नीने मुस्लीम तांत्रिक मुहम्मद सलीम याची भेट घेऊन काही उपाय करण्यास सांगितले होते. तेव्हा या तांत्रिकाने त्यांना नातीचे रक्त न सांडता तिचा बळी देण्यास सांगितले.

हे ही वाचा:

तुकाराम सुपेंच्या घरातून २ कोटी जप्त

हेमा मालिनी म्हणतात, अयोध्या, काशीनंतर मथुरा

तेलंगणामध्ये समलैंगिक पुरुष अडकले लग्नबंधनात!

नव्या घोटाळ्याची भरती; पोलीस परीक्षेत घोळ

मांत्रिकाच्या सल्ल्यानुसार काकांच्या पत्नीने मध्यरात्री नसिरुद्दीन आणि शालीहा यांच्या सहा महिन्यांच्या मुलीचे अपहरण केले. त्यानंतर त्या लहान मुलीला घरामागील फिश टँकमध्ये बुडवले. सकाळी शालीहा हिला जाग आल्यावर शेजारी आपली मुलगी नसल्याचे तिच्या लक्षात आले तेव्हा काकांच्या पत्नीने तिला घरामागे नेले आणि जबरदस्तीने मृत मुलीला घराच्या मागच्या अंगणात पुरण्यास सांगितले. तहशील कार्यालयात मुलीच्या मृत्यूची नोंद करायला गेल्यावर तहशीलदाराने संशय व्यक्त केला आणि याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर तपासातून हे प्रकरण समोर आले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा