27 C
Mumbai
Friday, August 19, 2022
घरराजकारणहेमा मालिनी म्हणतात, अयोध्या, काशीनंतर मथुरा

हेमा मालिनी म्हणतात, अयोध्या, काशीनंतर मथुरा

Related

काशीनंतर आता मथुरामध्येही भव्य मंदिर निर्माण व्हावे अशी इच्छा मथुरा मतदार संघाच्या खासदार हेमा मालिनी यांनी व्यक्त केली आहे. भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनी अयोध्या आणि काशीपाठोपाठ मथुरालाही भव्य मंदिर मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे. रविवारी १९ डिसेंबरला इंदूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या की, रामजन्मभूमी आणि काशीच्या पुनरुज्जीवनानंतर मथुरा हे स्थळ देखील अत्यंत महत्त्वाचे आहे.

हेमा मालिनी या इंदूरमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा त्या म्हणाल्या की, प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक असलेल्या भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मथुरेतून मी खासदार म्हणून निवडून आल्याने तिथे भव्य मंदिर व्हायला हवे. तिथे पूर्वीपासून एक मंदिर आहे. मात्र, त्याला अजून भव्य बनवले जाऊ शकते. त्याला काशी- विश्वनाथ कॉरिडॉर सारखे रूप दिले जाऊ शकते, असेही त्या म्हणाल्या.

हे ही वाचा:

तेलंगणामध्ये समलैंगिक पुरुष अडकले लग्नबंधनात!

नव्या घोटाळ्याची भरती; पोलीस परीक्षेत घोळ

देशात फोफावतोय ओमिक्रोन; राज्यात ५४ बाधित रुग्ण

शास्त्रज्ञाने घडवला रोहिणी न्यायालयात स्फोट 

हेमा मालिनी म्हणाल्या, ‘अयोध्या आणि काशीनंतर आता मथुराचा विकास आवश्यक आहे. हे देखील कार्य व्हायला हवे,’ असे त्या म्हणाल्या. काशी विश्वनाथचे परिवर्तन झाले आहे ते सोपे नव्हते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते शक्य करून दाखवले, असेही त्या म्हणाल्या.

यापूर्वी केंद्रीय कृषी राज्यमंत्री संजीव बल्यान म्हणाले होते, ‘अयोध्येतील रामजन्मभूमीवर भव्य मंदिर बांधले जात असताना, कृष्णाची जन्मभूमी असलेल्या मथुरेत काहीतरी मोठे आणि भव्य मंदिर बांधले पाहिजे. रामभूमीत भव्य मंदिर बांधले गेले आहे, पण कृष्णाच्या भूमीत अजून काही मोठे घडायचे आहे.’

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,910चाहतेआवड दर्शवा
1,919अनुयायीअनुकरण करा
23,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा