30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरविशेषदेशात फोफावतोय ओमिक्रोन; राज्यात ५४ बाधित रुग्ण

देशात फोफावतोय ओमिक्रोन; राज्यात ५४ बाधित रुग्ण

Google News Follow

Related

जगभरात धुमाकूळ घालणारा ओमिक्रोन आता भारतात फोफावताना दिसत आहे. देशातील ओमिक्रोन बाधितांची संख्या आता वाढू लागली असून या रुग्णांची संख्या १५१ वर पोहचली आहे. विशेष चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्रात ओमिक्रोन रुग्णांची संख्या सर्वाधिक ५४ आहे. ओमिक्रोनसह कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

देशातील ओमिक्रोन बाधित रुग्णांची संख्या १५१ वर पोहोचली असून महाराष्ट्रात ही संख्या ५४ आहे. आता कोरोना बाधितांची संख्या देखील वाढू लागली आहे. महाराष्ट्रात रविवारी नव्या ९०२ रुग्णांची नोंद झाली आहे आणि नऊ मृत्यू झाले. महाराष्ट्रात ओमिक्रोनने पहिला शिरकाव डोंबिवलीमध्ये केला होता. त्यानंतर आता हळूहळू रुग्णसंख्या वाढू लागली आहे. राज्यात रविवारी ओमिक्रोनचे नवे सहा रुग्ण आढळून आले असून या रुग्णांची संख्या आता ५४ झाली आहे.

हे ही वाचा:

१९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; यश धुल करणार नेतृत्त्व

शास्त्रज्ञाने घडवला रोहिणी न्यायालयात स्फोट 

व्हॅटिकनच्या भेटीत पोप फ्रान्सिस काय म्हणाले होते, पंतप्रधान मोदींना

‘सत्तेच्या अनेक उलथापालथनंतरही गोवा भारतीयत्व विसरला नाही; भारत गोव्याला विसरला नाही

कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटने पुन्हा एकदा जगाला अलर्टवर आणले आहे. भारतानेही खबरदारीचा उपाय म्हणून आंतरराष्ट्रीय प्रवासावर काही बंधने घातली आहेत. वाढती रुग्णासंख्या आणि आता नव वर्षाच्या स्वागतासाठी होणारी गर्दी लक्षात घेता मुंबईतही १४४ कलम लागू केले आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार ओमिक्रोन हा कमी प्रभावी आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना संबंधी नियम पाळावेत, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा