28 C
Mumbai
Monday, September 26, 2022
घरक्राईमनामासदा सरवणकरांचं ते पिस्तूल पोलिसांकडून जप्त

सदा सरवणकरांचं ते पिस्तूल पोलिसांकडून जप्त

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादर, प्रभादेवीमध्ये दोन दिवसांपूर्वी राडा झाला होता.

Related

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादर, प्रभादेवीमध्ये दोन दिवसांपूर्वी राडा झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे समर्थक आमनेसामने आले होते. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात असलेले आमदार सदा सरवणकर यांचं परवाना असणारं पिस्तूल दादर पोलिसांनी जप्त केलं आहे. दादर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याच्या आरोपाखाली सदा सरवणकर यांच्याविरोधात रविवारी शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणात दादर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. पहिल्या गुन्ह्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले महेश सावंत यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. दुसरा गुन्हा आमदार सदा सरवणकर, त्यांचे पुत्र समाधान सरवणकर, संतोष तेलवणे आणि इतर कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी सदा सरवणकर यांचं परवाना असणारं पिस्तूल दादर पोलिसांनी जप्त केलं आहे. तर हे पिस्तुल फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानमधील पूरग्रस्तांना हिंदूनी मंदिरात दिला आश्रय

इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ जाहीर

पाकिस्तान विरुद्धच्या विजयाचा आनंद श्रीलंकेपेक्षा अफगाणिस्तानला जास्त

अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रभादेवीत दोन्ही गटांचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते. पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटवला होता. मात्र, पुन्हा शनिवारी या वादाचे पडसाद उमटले होते. त्यावेळी शाब्दिक चकमकीवरून हे वाद हाणामारीत रुपांतर झाले तर सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात आला. मात्र, सदा सरवणकर यांनी हे आरोप फेटाळून लावले. तसंच शिंदे गटाचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांना मारहाण करण्यात झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,966चाहतेआवड दर्शवा
1,943अनुयायीअनुकरण करा
40,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा