खळबळजनक! नेव्ही नगरमध्ये खलाशाचा दोन चिमुरडींसह मृत्यू

मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात

खळबळजनक! नेव्ही नगरमध्ये खलाशाचा दोन चिमुरडींसह मृत्यू

कुलाबा येथील नौदल वसाहतीत (नेव्ही नगर) घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली आहे. एका नौदल खलाशाने आपल्या दोन लहान मुलांसह राहत्या घरी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत अवघ्या दोन महिन्यांच्या तान्हुल्यासह तीन वर्षांच्या बालकाचाही मृत्यू झाला आहे.

​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित खलाशाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय आहे. तर दुसरीकडे, त्याच्या दोन्ही चिमुरड्या मुलांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात असून,  शवविच्छेदन) आणि न्यायवैद्यक (फॉरेन्सिक लॅब) अहवाल आल्यानंतरच यामागचे सत्य समोर येईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

कांगारूंना घरातच लोळवलं! बांगलादेशचा ऐतिहासिक विजय

डोंबिवलीत लोकलच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू

मनोरुग्णाची स्टॅन्ड अप कॉमेडी अर्थात ऑपरेशन पागलखाना |

गावागावांतून शोधणार भारताचे भावी चॅम्पियन!

​या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरून फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
​पोलिस आता या प्रकरणी मयताचे कुटुंबीय, शेजारी आणि इतर साक्षीदारांचे जबाब नोंदवत आहेत. नेमकी कोणत्या कारणातून ही दुर्दैवी घटना घडली? आणि यामागील पार्श्वभूमी काय होती? याचा कसून शोध घेतला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत असून, पुढील तपशीलांची प्रतीक्षा आहे.

Exit mobile version