28.3 C
Mumbai
Sunday, August 16, 2026
घरक्राईमनामाबोरिवलीत प्रयोगशाळेत केली जात होती गांजाची लागवड

बोरिवलीत प्रयोगशाळेत केली जात होती गांजाची लागवड

पोलिसांकडून एकाला अटक, १.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Google News Follow

Related

मुंबईतील एम. एच. बी. कॉलनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोरिवली पश्चिम येथील गणपत पाटील नगरमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत हायड्रोपोनिक पद्धतीने गांजा उगवण्याची बेकायदा कल्टिवेशन लॅब उपकरणासह उद्ध्वस्त केली आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास गणपत पाटील नगर, गल्ली नंबर ४, जिवादानी माता मंदिराच्या बाजूला, बोरिवली पश्चिम येथे ही कारवाई करण्यात आली. एम. एच. बी. कॉलनी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

हे ही वाचा:

खळबळजनक! नेव्ही नगरमध्ये खलाशाचा दोन चिमुरडींसह मृत्यू

डोंबिवलीत लोकलच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू

कांगारूंना घरातच लोळवलं! बांगलादेशचा ऐतिहासिक विजय

गावागावांतून शोधणार भारताचे भावी चॅम्पियन!

​पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या पंचनाम्यानुसार, हायड्रोपोनिक पद्धतीने गांजाची लागवड करण्यासाठी वापरण्यात आलेली अत्याधुनिक उपकरणे, विविध रसायने आणि लागवड केलेले साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने ​सुका हायड्रा गांजा व रोपे असा एकूण ५४ ग्रॅम वजनाचा सुका हायड्रा गांजा जप्त करण्यात आला असून, याची अंदाजे किंमत १लाख ६२हजार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याप्रकरणी पोलिसांनी बब्बु सोनू कामत (३०) याला अटक केली आहे. बब्बू हा पेशाने इलेक्ट्रीशियनअसून गणपत पाटील नगर, बोरिवली पश्चिम,येथे राहणारा आहे. ​पोलिसांनी आरोपीला १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७:३३ वाजता अटक केली आहे. हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घरातच गांजाची लागवड केल्या जाणाऱ्या या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा