28.1 C
Mumbai
Monday, August 17, 2026
घरक्राईमनामावाराणसी विमानतळावर प्रवाशाच्या बंदुकीतून सुटली गोळी!

वाराणसी विमानतळावर प्रवाशाच्या बंदुकीतून सुटली गोळी!

दोन सुरक्षा कर्मचारी गोळी लागून जखमी

Google News Follow

Related

वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी सकाळी शस्त्र तपासणीदरम्यान अचानक गोळी सुटल्याने मोठी खळबळ उडाली. या घटनेत विमानतळावरील दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांना गोळी लागून ते जखमी झाले. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आजमगडचा एक प्रवासी आपल्या पत्नीसोबत एअर इंडिया एक्सप्रेसच्या मुंबईला जाणाऱ्या IX-1810 विमानाने प्रवास करणार होता. त्याच्याकडे परवानाधारक पिस्तूल आणि मॅगझिन होते. प्रवाशाने विमानात शस्त्र घेऊन जाण्याची पूर्वकल्पना दिली होती. त्यानंतर विमानतळावर शस्त्र आणि त्यासंबंधीच्या कागदपत्रांची तपासणी सुरू करण्यात आली.
हे ही वाचा:
खळबळजनक! नेव्ही नगरमध्ये खलाशाचा दोन चिमुरडींसह मृत्यू

डोंबिवलीत लोकलच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू

‘शर्मिला टागोर यांनी इस्लाम स्वीकारून मुलांना धर्माचे शिक्षण दिले’

विमल जाहिरातीवर एफडीएचा दणका; शाहरुख, अजय, टायगरला नोटीस

रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही तपासणी सुरू असताना अचानक पिस्तुलातून एक राउंड फायर झाला. गोळी आधी जमिनीवर आदळली आणि त्यानंतर जवळ उभ्या असलेल्या दोन AAICLAS सुरक्षा कर्मचाऱ्यांना लागली. एका महिला कर्मचाऱ्याच्या मांडीला गोळी लागली, तर एका पुरुष कर्मचाऱ्याच्या हाताला दुखापत झाली. दोघांनाही तातडीने न्यू लक्ष्मी ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच विमानतळ परिसरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. स्थानिक पोलिसांना तातडीने कळवण्यात आले असून वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. नेमक्या कोणत्या परिस्थितीत पिस्तुलातून गोळी सुटली, शस्त्राची तपासणी करताना कोणती प्रक्रिया पाळली जात होती आणि या घटनेत नेमकी चूक कुठे झाली, याचा तपास सुरू आहे.

विमानतळ संचालक पुनीत गुप्ता यांनी सांगितले की, प्रवाशाने शस्त्र घोषित केले होते आणि त्याची तपासणी सुरू असतानाच गोळी सुटली. या घटनेनंतर दोन्ही जखमी कर्मचाऱ्यांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

विमानतळासारख्या अतिसंवेदनशील आणि कडेकोट सुरक्षा असलेल्या ठिकाणी शस्त्र तपासणीदरम्यानच गोळी सुटल्याने सुरक्षा प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, ही घटना नेमकी निष्काळजीपणामुळे घडली की शस्त्र हाताळताना अन्य काही कारणामुळे गोळी सुटली, हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा