27.7 C
Mumbai
Monday, August 17, 2026
घरक्राईमनामाखळबळजनक! नेव्ही नगरमध्ये खलाशाचा पत्नी, दोन चिमुरडींसह मृत्यू

खळबळजनक! नेव्ही नगरमध्ये खलाशाचा पत्नी, दोन चिमुरडींसह मृत्यू

मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात

Google News Follow

Related

कफ परेड परिसरातील नेव्ही नगरमधून एक अत्यंत दुर्देवी आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. नेव्ही नगर येथील राहत्या घरात नौदलातील एका खलाशी कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे, तर त्याच्याच खोलीत पत्नी आणि दोन लहान मुलांचे मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आले आहेत. या चौघांच्या मृत्यूने संपूर्ण मोठी खळबळ उडाली आहे.

पुरणमल शंभूलाल मेहरा (वय ३०) असे मृत नौदल कर्मचाऱ्याचे नाव असून, ते नौदलात खलाशी पदावर कार्यरत होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी ओमा पुरणमल मेहरा (वय २८), ३ वर्षांचा मुलगा यश आणि अवघ्या २ महिन्यांचे लहान बाळ याच घरात राहत होते.

हे ही वाचा:

कांगारूंना घरातच लोळवलं! बांगलादेशचा ऐतिहासिक विजय

डोंबिवलीत लोकलच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू

मनोरुग्णाची स्टॅन्ड अप कॉमेडी अर्थात ऑपरेशन पागलखाना |

गावागावांतून शोधणार भारताचे भावी चॅम्पियन!

कफ परेड पोलीस ठाण्याला १५ ऑगस्ट २०२६ रोजी नेव्ही नगरमधील एका घरात चार जण मृत अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली. या माहितीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुरणमल मेहरा यांचा मृतदेह घराजोबत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तर त्यांच्या पत्नी आणि दोन मुले बेडवर मृतावस्थेत पडून होती. पोलिसांनी कफ परेड मोबाईल व्हॅनच्या सहाय्याने चारही मृतदेह तातडीने पुढील तपासणी व उपचारासाठी जे. जे. हॉस्पिटलमध्ये हलवले आहेत.

विषबाधेचा प्राथमिक संशय

घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून सध्या ही प्रक्रिया सुरू आहे. प्राथमिक चौकशीनुसार, पुरणमल मेहरा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसत आहे; तर त्यांची पत्नी आणि दोन चिमुरड्यांचा मृत्यू विषप्रयोग झाल्यामुळे झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे नेव्ही नगर परिसर शोकाकुल झाला असून, आत्महत्या आणि हत्येच्या या गूढ प्रकरणाचा कफ परेड पोलीस कसून शोध घेत आहेत. शवविच्छेदनाचे अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा