30 C
Mumbai
Saturday, February 21, 2026
घरक्राईमनामासलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पुन्हा धमकी, पाच कोटींची मागणी

सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पुन्हा धमकी, पाच कोटींची मागणी

पोलिसांकडून शोध सुरू

Google News Follow

Related

बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला येणाऱ्या धमक्यांचे सत्र अजूनही सुरू असून पुन्हा एकदा सलमानच्या नावे धमकी आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. सलमान खानला मंगळवार, ५ नोव्हेंबर रोजी लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून नव्याने धमकी मिळाली आहे. या धमकीतही धमकी देणाऱ्याने पाच कोटी रुपयांची मागणी केली आहे. तसेच माफी मागण्याचेही म्हटले आहे.

अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पुन्हा धमकी मिळाली आहे. माहितीनुसार, मुंबई पोलीस वाहतूक नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सऍप क्रमांकावर लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने धमकीचा संदेश आला आहे. या मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, “मी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ बोलतोय आणि जर सलमान खानला जिवंत राहायचे असेल तर त्याने आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी किंवा पाच कोटी रुपये द्यावेत. तसे न केल्यास जीवे मारले जाईल. आमची गँग आजही सक्रिय आहे.” यानंतर पोलिसांकडून मेसेज पाठवणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.

हे ही वाचा:

कॅनडामधील हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ हजारो कॅनेडियन हिंदूंकडून एकता रॅली

ग्रँटरोडच्या हॉटेलच्या खोलीत सापडला सुरतच्या व्यापाऱ्याचा मृतदेह,मृतदेहासोबत होती मुलगी

जेएमएम-काँग्रेसची युती म्हणजे, ‘घुसखोरांची आघाडी’,’माफियांचा गुलाम’

दोस्त दोस्त ना रहा!?

माहितीनुसार, सोमवरी रात्री उशिरा हा धमकीचा मेसेज पाठवण्यात आला होता. मध्यरात्री वाहतूक नियंत्रण कक्षात काम करणाऱ्या अधिकाऱ्याला हा संदेश दिसला. पोलीस सध्या त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वी सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी नोएडा येथून एका व्यक्तीला अटक केली होती. मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक हेल्पलाइन क्रमांकावर व्हॉट्सऍप मेसेज पाठवून सलमान खानकडून दोन कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, एप्रिल २०२४ मध्ये सलमानच्या घरावर गोळीबारही करण्यात आला होता. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
295,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा