29 C
Mumbai
Saturday, January 3, 2026
घरक्राईमनामाआंध्र प्रदेशात 'टेक' शंकरसह सात नक्षलवादी ठार

आंध्र प्रदेशात ‘टेक’ शंकरसह सात नक्षलवादी ठार

नक्षलवादी नेता माडवी हिडमा याला ठार केल्याच्या दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई

Google News Follow

Related

मंगळवारी आंध्र प्रदेशातील मारेदुमिल्ली भागात झालेल्या चकमकीत डोक्यावर तब्बल १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी नेता माडवी हिडमा याचा मृत्यू झाला. त्याच्यासह त्याची पत्नी, इतर चार सुरक्षा रक्षकांचा देखील खात्मा करण्यात आला. यामुळे नक्षल चळवळीला मोठा फटका बसला आहे. अशातच आता बुधवारी, दुसऱ्या दिवशीही पुन्हा एकदा गोळीबार झाला, ज्यामध्ये सात नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

विजयवाडा येथे पत्रकार परिषदेत बोलताना, आंध्र प्रदेश गुप्तचर विभागाचे एडीजी महेश चंद्र लड्ढा म्हणाले की, संबंधित ताजी चकमक ही मंगळवारच्या कारवाईचाच एक भाग होती. क्षेत्रातून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सात नक्षलवादी ठार झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. ठार झालेल्यांमध्ये तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश असल्याचे ते म्हणाले. चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पडताळणी प्रक्रिया अद्याप सुरू आहे. तथापि, मृतांपैकी एकाची ओळख मेतुरी जोखा राव उर्फ ‘टेक’ शंकर अशी झाली आहे, जो मूळचा श्रीकाकुलमचा रहिवासी आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शंकर हा आंध्र-ओडिशा सीमा (AOB) प्रदेशासाठी क्षेत्र समिती सदस्य (ACM) म्हणून काम करत होता. याशिवाय तांत्रिक ऑपरेशन्स, शस्त्रास्त्र निर्मिती आणि दळणवळणात तज्ज्ञ म्हणून देखील काम पाहत होता. मंगळवारी झालेल्या चकमकीत हिडमा आणि इतर पाच जणांना ठार करण्यात आले होते. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे आजची कारवाई करण्यात आली, असे लड्ढा म्हणाले. एनटीआर, कृष्णा, काकीनाडा, कोनासीमा आणि एलुरु जिल्ह्यांमध्ये ५० माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे, जी आंध्र प्रदेशच्या इतिहासातील सर्वात मोठी अटक आहे, असेही त्यांनी सांगितले.

सुरक्षा दलांनी ४५ शस्त्रे, २७२ राउंड, दोन मॅगझिन, ७५० ग्रॅम वायर आणि इतर साहित्य जप्त केले. त्यांनी पुढे सांगितले की, पोलिस छत्तीसगडमधील माओवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत आणि त्यांच्या हालचाली आणि लपण्याच्या ठिकाणांचे निरीक्षण केल्यानंतर ही नवीनतम कारवाई सुरू केली आहे.

हे ही वाचा:

काँग्रेस खासदार इम्रान मसूद म्हणतात, तो दहशतवादी एक वाट चुकलेला तरूण!

अमेरिकेतून अनमोल बिश्नोई हद्दपार; भारतात आणणार

लहान-लहान दाण्यात दडलेला आरोग्याचा मोठा खजिना

सीएनजीच्या तुटवड्याचा जनजीवनाला फटका; पंपांवर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा

माडवी हिडमाच्या डोक्यावर तब्बल १ कोटी रुपयांचे बक्षीस होते. त्याची हत्या हा या प्रदेशातील नक्षलवादाला मोठा धक्का आहे. केंद्र सरकारने त्याच्यावर ४५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, तर छत्तीसगडने २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते आणि इतर राज्यांनीही त्याच्यावर बक्षीस जाहीर केले होते. माडवी हिडमाचा संबंध अनेक हाय-प्रोफाइल हल्ल्यांशी होता, ज्यात २०१० च्या ताडमेटला हत्याकांड आणि २०२१ च्या सुकमा हल्ल्याचा समावेश होता ज्यामध्ये २२ सुरक्षा कर्मचारी मारले गेले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा