27 C
Mumbai
Sunday, March 22, 2026
घरक्राईमनामामुंबईत बदलापूरच्या घटनेची पुनरावृत्ती?, एकानेच केला दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

मुंबईत बदलापूरच्या घटनेची पुनरावृत्ती?, एकानेच केला दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पोलिसांनी अवघ्या तीन तासात केली अटक

Google News Follow

Related

मुंबईत बदलापूरच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. मुंबईतील समता नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार व सहा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ झाल्याची घटना समोर आली असून समता नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

आरोपीचे नाव रहीम पठाण असे असून त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती समता नगर पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती समता नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण राणे यांनी दिली आहे.

बऱ्याच दिवसांपासून आरोपी जेव्हा संधी मिळेल तेव्हा अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करत असल्याचे उघडकीस आले आहे. आज पीडितेच्या कुटुंबीयांनी नजीकचे असलेले समता नगर पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी तात्काळ आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अवघ्या ३ तासांत आरोपीला अटक केली. आरोपी आणि पीडिता दोघेही एकाच परिसरात राहतात. समता नगर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्र बंद मागे; पवारांच्या ट्विटने ठाकरेंची हवाच काढली !

शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र बंद मागे घ्या!

बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शकीब हल हसनवर हत्येचा गुन्हा

बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शकीब हल हसनवर हत्येचा गुन्हा

मुंबईत बदलापूरच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. एका आरोपीनेच दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. या दुर्दैवी घटेनेची माहिती समजताच कांदिवली परिसरात खळबळ उडाली आहे. दोन वर्षीय चिमुरडी घराबाहेर खेळत असताना या मुलीवर नराधमाने लैंगिक अत्याचार केले. ही घटना ८ तारखेला घडली असून या घटनेबाबत गुन्हा काल रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे. तसेच १४ वर्षीय मुलीसमोर आरोपीने अश्लील चाळे केले असल्याचे देखील समोर आले आहे. आरोपी रहीम पठाणला समता नगर पोलिसांनी अवघ्या तीन तासात बेड्या ठोकल्या आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
299,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा