29 C
Mumbai
Tuesday, April 28, 2026
घरक्राईमनामालैंगिक छळ, खाजगी फोटो लीक करण्याच्या धमक्या

लैंगिक छळ, खाजगी फोटो लीक करण्याच्या धमक्या

नाशिक टीसीएसमधील पीडितेचा भयानक अनुभव

Google News Follow

Related

नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी (TCS) च्या बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग (बीपीओ) युनिटमधून समोर आलेल्या लैंगिक छळ आणि शोषणाच्या आरोपांमुळे हादरला आहे.. येथे काम करणाऱ्या काही तरुण महिलांनी पुढे येत अत्यंत धक्कादायक आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडून त्यांच्यावर लैंगिक आणि मानसिक छळ केला जात होता. पीडित महिलांनी सांगितले की, सुरुवातीला त्यांच्याशी चांगले वागून विश्वास संपादन केला गेला. पण नंतर हळूहळू त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. काही महिलांना त्यांच्या खाजगी फोटो आणि व्हिडिओ लीक करण्याची धमकी देण्यात आली. या भीतीमुळे अनेक जणी बराच काळ गप्प राहिल्या. नोकरी जाण्याची आणि कुटुंबावर परिणाम होण्याची भीती त्यांना सतावत होती.
हे ही वाचा:
भारत- अमेरिका जेट इंजिन करार; तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यावर भर

सेन्सेक्सची १,२६४ अंकांची झेप; निफ्टी २४,२०० पार

पाकिस्तानात सिरिंजचा पुनर्वापर; ३३१ मुलांना HIV संसर्ग

गोल्ड लोनमध्ये दक्षिणेचा दबदबा कायम

या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. काही पीडितांनी असा आरोप केला आहे की, त्यांच्यावर धार्मिक बाबतीतही दबाव टाकण्यात आला. हिंदू मुलींना त्यांच्या श्रद्धेविषयी चुकीच्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. यामुळे हा विषय अधिक संवेदनशील बनला आहे. २३ वर्षीय दलित हिंदू पीडितेने दाखल केलेल्या पहिल्या अधिकृत तक्रारीत दानिश शेख आणि तौसीफ अत्तर यांच्यासोबत नमूद आहे. तक्रारदाराने सांगितले की जुलै २०२२ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान या तिघांनी हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली, ज्यामुळे तिच्या धार्मिक भावना दुखावल्या. तसेच, आधीच विवाहित असलेल्या दानिशने लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, तर तौसीफनेही कार्यस्थळी तिच्याशी लैंगिक प्रस्ताव ठेवले.

महिलांनी असेही सांगितले की, आर्थिक किंवा वैयक्तिक अडचणीत असलेल्या मुलींना मुद्दाम लक्ष्य केले जात होते. त्यांच्याशी मैत्री करून, नंतर त्यांचा गैरफायदा घेतला जात होता. काही प्रकरणांमध्ये प्रेमाचे नाटक करून फसवणूक केल्याचेही आरोप आहेत.

या सर्व प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. तपासासाठी विशेष पथक नेमण्यात आले असून अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही आरोपींना अटकही करण्यात आली आहे. तसेच कंपनीच्या तक्रार यंत्रणेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत, कारण आधीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.

ही घटना फक्त एका कंपनीपुरती मर्यादित नसून, संपूर्ण समाजासाठी इशारा आहे. महिलांना सुरक्षित आणि सन्मानाने काम करता येणे ही प्रत्येक संस्थेची जबाबदारी आहे. त्याचबरोबर, कोणाच्याही श्रद्धेवर आघात होऊ नये हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा