28 C
Mumbai
Friday, April 3, 2026
घरक्राईमनामाबांगलादेशातून कट रचणारा शब्बीर लोनच्या मुसक्या आवळल्या

बांगलादेशातून कट रचणारा शब्बीर लोनच्या मुसक्या आवळल्या

लष्कर ए तैयबाकडून घेतले होते प्रशिक्षण

Google News Follow

Related

बांग्लादेशातून भारतात दहशतवादी हल्ल्यांचे कट रचत असल्याच्या आरोपाखाली लष्कर ए तैयबाचा एक दहशतवादी दिल्ली सीमेजवळ अटक करण्यात आला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.

आरोपी शब्बीर अहमद लोन उर्फ राजा उर्फ काश्मीरी हा जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यातील कंगन येथील रहिवासी आहे. त्याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केंद्रीय यंत्रणांच्या समन्वयाने अटक केली. तो भारतविरोधी दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्यामुळे यंत्रणांच्या रडारवर होता.

अधिकाऱ्यांच्या मते, लोन बांग्लादेशात राहून पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयच्या मार्गदर्शनाखाली लष्करच्या भारतविरोधी कारवाया हाताळत होता. तो भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांसह बांग्लादेशी नागरिकांची भरती करून दहशतवादी कट रचत होता आणि पाकिस्तानचा सहभाग लपवण्याचा प्रयत्न करत होता.

ही अटक काही दिवसांपूर्वी दिल्ली आणि दक्षिण भारतातील काही भागांत कार्यरत असलेल्या लष्कर-संबंधित मॉड्यूलचा भंडाफोड झाल्यानंतर करण्यात आली. या गटाने दिल्ली आणि कोलकाता येथे भारतविरोधी पोस्टर्स लावल्याचा आरोप आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की लोन हा प्रशिक्षित दहशतवादी असून त्याने मुजफ्फराबाद येथील कॅम्पमध्ये बेसिक (दौरा ए आम ) आणि अ‍ॅडव्हान्स (दौरा ए खास) प्रशिक्षण घेतले आहे. त्याचे या संघटनेच्या वरिष्ठ नेतृत्वाशी जवळपास दोन दशकांपासून संबंध आहेत.

हे ही वाचा:

सपा खासदार बर्क यांच्या मेव्हण्यावर बलात्काराचा गुन्हा

‘धुरंधर २’ ने ११ दिवसांत ‘धुरंधर’च्या लाइफटाइम कलेक्शनला टाकले मागे

अधिक स्क्रीन टाइममुळे मुलांच्या हृदयाच्या आरोग्यावर वाढतो धोका

अमेरिका खर्ग बेट ताब्यात घेणार? काय म्हणाले ट्रम्प?

लोनला यापूर्वी २००७ मध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांसह अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याचे संबंध २६/११ मुंबई हल्ल्याचा सूत्रधार  हाफिज सईद आणि लष्कर कमांडर झकी उर रहमान लखवी यांच्याशी असल्याचे समोर आले होते.

तो २०१८ पर्यंत तिहार जेलमध्ये होता आणि नंतर जामिनावर सुटला. त्यानंतर तो पुन्हा बांग्लादेशात सक्रिय झाला आणि तिथून भारताविरोधी कारवाया करू लागला.

सध्या यंत्रणा त्याची चौकशी करत असून भरतीचे मार्ग, आर्थिक स्रोत आणि भारतातील संभाव्य लक्ष्य यांचा तपास केला जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
301,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा