बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी हिच्या बरेलीतील सिव्हिल लाईन्स परिसरातील वडिलोपार्जित घरावर शुक्रवारी रात्री गोळीबार झाल्याची घटना घडली. पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पाच पथके तयार केली आहेत. या हल्ल्याची जबाबदारी गँगस्टर गोल्डी ब्रारने घेतली आहे.
सिव्हिल लाईन्स परिसरातील व्हिला क्रमांक ४० येथील पटणी कुटुंबाच्या घराबाहेर गोळीबार झाला तेव्हा दिशा पटणीचे वडील आणि निवृत्त डीएसपी जगदीश सिंह पटणी, आई आणि मेजर बहीण खुशबू पटणी घरात उपस्थित होते. बरेलीचे वरिष्ठ एसपी अनुराग आर्य म्हणाले की, घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांना घराबाहेर अनेक गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
दिशा आणि खुशबू पटणी यांचे वडील जगदीश सिंह पटणी यांनी घटनेबद्दल सांगितले की, मध्यरात्री त्यांच्या घरी ८-१० राउंड गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी सर्वप्रथम आमची सुरक्षा सुनिश्चित केली. पोलिसांनी कोणतीही हलगर्जीपणा दाखवलेला नाही. अशा प्रकारच्या गुंडगिरीला पूर्णपणे आळा घातला पाहिजे.’
हे ही वाचा :
पॅलेस्टाईनला राज्याचा दर्जा देण्यासाठी भारतासह १४१ देशांचा पाठींबा
रशियातील कामचटकामध्ये जोरदार भूकंप, त्सुनामीचा इशारा जारी!
सुशीला कार्की बनल्या नेपाळच्या हंगामी पंतप्रधान, नरेंद्र मोदींनी दिली प्रतिक्रिया
तेव्हा सिंदूरवर बोंबाबोंब आता कुंकू आठवलं ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारानंतर लगेचच सोशल मीडियावर एक धमकीची पोस्ट व्हायरल झाली आहे. माहितीनुसार घटनेची जबाबदारी रोहित गोदरा आणि गोल्डी ब्रार टोळीने स्वीकारली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. “खुशबू हिने पूज्य संतांचा अपमान केला आहे. तिने सनातन धर्माचा अपमान केला आहे. आमच्या देवतांचा अपमान सहन केला जाणार नाही. हा फक्त एक ट्रेलर होता. पुढच्या वेळी जर तिने किंवा इतर कोणी आपल्या धर्माचा अनादर केला तर त्याच्या घरात कोणीही जिवंत राहणार नाही.” गोळीबारानंतर दिशा पटानी हिच्या घराबाहेर पालीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.







