अहमदाबादमध्ये दुपारच्या उजेडात दागिने चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेचा प्लॅन चांगलाच तिच्या अंगलट आला. सोनाराच्या डोळ्यांमध्ये मिरची पूड फेकून दागिने लुटण्याचा प्रयत्न या महिलेनं केला. पण सतर्क सोनारानं तिला क्षणात पकडलं आणि फक्त १५ सेकंदांत तब्बल १७ थपडा मारल्या. त्यानंतर तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याचा व्हीडिओ
चोरीचा प्लॅन फसला कसा?
३ नोव्हेंबर रोजी दुपारी अंदाजे १२:३० वाजता ही महिला ग्राहक बनून अहमदाबादच्या राणीप भागातील सोन्याच्या दुकानात आली. योग्य संधी मिळाल्यावर तिनं सोनाराच्या डोळ्यांत मिरची पूड फेकली. पण सोनारानं तात्काळ त्याचा प्रतिकार करत तिचा हल्ला चुकवला आणि तिला पकडलं. संतापलेल्या सोनारानं या महिलेला १५ सेकंदांत १७ थपडा मारल्या आणि नंतर तिला पोलिसांच्या हवाली केलं.
हे ही वाचा:
विचारवंत, संघटक आणि कर्मयोगी श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी
तेजस विमानांसाठी ११३ इंजिन खरेदीचा भारत- अमेरिकेमध्ये करार
घुसखोरीचा प्रयत्न उधळला; दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान
वंदे मातरम : भारतीय आत्म्याच्या गीताचा १५० वर्षांचा वैभवशाली इतिहास
आधीची घटना
याआधी सप्टेंबर महिन्यात दिल्लीतील भारत मंडपमाजवळ दोन ज्वेलर्सना बंदुकीच्या धाकानं सुमारे १ कोटी रुपयांच्या दागिन्यांची लूट करण्यात आली होती. शिवम कुमार यादव (२८) आणि राघव (५५) नावाचे हे दोघे चांदनी चौकहून स्कूटरवरून भैरव मंदिराकडे जात होते. त्यांच्याकडे सोने–चांदीचा माल होता. मंदिराजवळ दोन बाईकस्वारांनी त्यांना थांबवलं आणि बंदुकीच्या धाकावर ५०० ग्रॅम सोने आणि ३५ किलो चांदी असलेले दोन पिशव्या लुटून पसार झाले. ज्वेलरी दुकानात बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटना कैद झाली आहे.







