उत्तर प्रदेशच्या बरेलीत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासोबत गैरवर्तन केल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे व्हिडिओ ईदच्या दिवशीचे असल्याचे सांगितले जात आहे आणि काही युवकांनी ही घटना केल्याचा आरोप आहे.
व्हायरल व्हिडिओंमध्ये काही मुले आणि युवक पुतळ्याशी अयोग्य आणि अश्लील कृत्य करताना दिसत आहेत. या प्रकारामुळे सोशल मीडियावर मोठा संताप व्यक्त केला जात आहे. अनेक युजर्सनी हे व्हिडिओ शेअर करून बरेली पोलिसांना तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Brigadier Rudra Pratap Singh was visionary but still not visionary enough to imagine this
Gandhi ji would be so sad to see this 😢 pic.twitter.com/PA3tGzyKzF
— Amit Kumar Sindhi (@AMIT_GUJJU) March 24, 2026
हे ही वाचा:
भारताच्या AI क्षेत्रात मोठी झेप
वंदे मातरमविरोधातली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
इंधन टंचाईच्या अफवा निराधार; देशात पुरेसा साठा
“अमेरिका स्वतःशीच वाटाघाटी करतेय”
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बरेली पोलिसांनी यांनी याची दखल घेतली आहे. त्यांनी एक्स (ट्विटर) वर प्रतिक्रिया देत म्हटले की, “संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.”
या घटनेवर अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. लेखक आणि विचारवंत रतन सारदा यांनी एका पोस्टवर प्रतिक्रिया देताना टीका केली आहे. तसेच काही लोकांनी मुलांच्या मनात वाढत असलेल्या द्वेषपूर्ण प्रवृत्तीबद्दलही चिंता व्यक्त केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील कारवाईची प्रतीक्षा आहे.
या व्हीडिओसंदर्भात राजकीय पक्षांची भूमिका मात्र स्पष्ट झालेली नाही. विशेषतः महात्मा गांधींच्या नावावरून राजकारण करणाऱ्या काँग्रेससारख्या पक्षांची यासंदर्भातली भूमिका काय हे समोर आलेले नाही.







