25 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरक्राईमनामाचोरीची सवय लागली, त्यातून वडिलांचीच हत्या केली!

चोरीची सवय लागली, त्यातून वडिलांचीच हत्या केली!

सहा लाख रुपयांची सुपारी दिली होती

Google News Follow

Related

फर्निचर व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी त्याच्या अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी हत्येप्रकरणी तिघांना अटक केली आहे. या हत्येत सहभागी झालेले कल्लू माफिया डॉन स्वप्नदीप यादव व आकाश गुप्ता उर्फ बाबा पोलिसांच्या हातात अद्याप आलेले नाहीत. या सर्व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी अद्याप समजू शकली नाही.

या व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने मित्र शुभम सोनी आणि प्रियांशु उफ गोलू मिश्रा यांच्या मदतीने कल्लू माफिया डॉन उर्फ स्वप्नदीप याला पित्याची हत्या करण्यासाठी सहा लाख रुपयांची सुपारी दिली होती. आगाऊ रक्कम म्हणून दोन लाख रुपयेही दिले. आधी मुलगा स्वतःच वडिलांची हत्या करणार होता, मग बेत बदलला.

हे ही वाचा:

चांद्रयान ३ची लँडिंग साइट ‘शिवशक्ती’ नावानेच ओळखली जाणार!

माजी हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया यांचा भाजपमध्ये प्रवेश!

तांबड्या समुद्रात भारतीय नौदलाची करडी नजर, चाच्यांना ‘मामा’ बनवणार

‘आप’कडून अनैतिक राजकारणाचे उदाहरण’

या अल्पवयीन मुलाला वाईट संगत लागली होती. तो गल्ल्यातून पैसेही चोरत असे. एकदा त्याने वडिलांच्या खात्यातून तीन लाख रुपये काढून मित्राच्या खात्यात वळते केले होते आणि त्या पैशाने महागडी बाइक खरेदी केली होती. त्याच्या वाढत्या चोरीमुळे त्याच्या खर्चावर निर्बंध आणण्यात आले होते. त्यामुळे त्याला त्रास होत होता. या फर्निचर व्यावसायिकाची कल्लू माफिया डॉन याने गोळी झाडून हत्या केली. या हत्येप्रकरणी अल्पवयीन मुलाचे मित्र प्रियांशू, शुभम व कल्लू माफिया डॉनच्या टोळीतील पियुष पाल यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. पित्याच्या हत्येची सुपारी देणाऱ्या अल्पवयीन मुलाला पकडण्यात आले असले तरी त्या मुलाच्या चेहऱ्यावर पश्चातापाची कोणतीही भावना नव्हती. वडिलांनी कठोर निर्बंध लावल्यामुळे हे पाऊल उचलावे लागले, असे या मुलाने सांगितले.

१० लाख रुपये घेऊन घरातून पळाला होता

हा मुलगा १० महिन्यांपूर्वी घरातून १० लाख रुपये घेऊन पळाला होता. तेव्हा त्याने आता आपण मोठा माणूस होऊनच परतू, असे पत्र लिहिले होते. मात्र तो दुसऱ्या दिवशीच घरी परतला होता. दहावीत असताना त्याच्या बॅगमध्ये शिक्षकांना एक पिस्तुलही सापडले होते. त्यानंतर त्याने शिक्षणाला राम राम ठोकला होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा