32 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरक्राईमनामासोनाली फोगट हत्या प्रकरणात रेस्टॉरंटचा मालक अटकेत

सोनाली फोगट हत्या प्रकरणात रेस्टॉरंटचा मालक अटकेत

तेलंगणा पोलिसांनी त्याला केली अटक

Google News Follow

Related

भाजपा नेत्या सोनाली फोगट यांच्या हत्येप्रकरणात नाव असलेल्या गोव्यातील रेस्टॉरंटच्या मालकाला आता तेलंगणा पोलिसांनी अटक केली आहे. कर्लीस रेस्टॉरंटचा मालक एडविन न्युन्स याला पोलिसांनी अंजुना, गोवा येथून अमली पदार्थाच्या प्रकरणात अटक केली आहे. सप्टेंबरमध्ये सोनाली फोगट हत्याकांडात अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये एडविन याचाही समावेश होता. मात्र, नंतर त्याला जामीन मिळाला आणि तो तुरुंगातून बाहेर आला.

सोनाली फोगट खून प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. सोनाली फोगट शेवटची कर्लीस रेस्टॉरंटमध्ये पार्टी करताना दिसली होती, नंतर तो व्हिडिओही व्हायरल झाला होता. नंतर रेस्टॉरंटचा मालक एडविन न्युन्स तेलंगणा पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

हैदराबाद, तेलंगणा येथे तीन महिन्यांपूर्वी ड्रग्ज प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर पोलिसांना ड्रग विक्रेत्यांमध्ये एडविनचाही समावेश असल्याचं आढळले. एडविन हा बनावट कोविड प्रमाणपत्रे बनवण्याच्या प्रकरणातही आरोपी होता. दरम्यान सोनाली फोगट यांच्या हत्येप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी त्याला स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली आणि हैदराबादला नेले आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाने एडविनला गेल्या आठवड्यात ७ नोव्हेंबरपर्यंत तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तेलंगणा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

हे ही वाचा:

दहशतवादी अबू हंजलाला अटक

अंधेरी पोटनिवडणुकीत मतदारांचे नोटालाही प्राधान्य

श्रीलंकेचा फलंदाज दानुष्काला बलात्काराच्या आरोपात अटक

हाऊसकिपिंग करणाऱ्यानेच घर ‘साफ’ केले, २४ तासांत जेरबंद

दरम्यान, या प्रकरणात मुख्‍य संशयित आरोपी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांच्‍यासह ‘कर्लिस बार’चे केअर टेकर एडवीन न्युन्स, ड्रग्‍स पुरविणारे पेडरल दत्तप्रसाद गावकर आणि रामदास मांद्रेकर यांना पोलिसांनी अटक केली होती. त्‍यांची चौकशीनंतर मुख्‍य संशयित सोडून इतरांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा