लडाखचे पोलिस महासंचालक (डीजीपी) एस डी सिंग जामवाल यांनी सोनम वांगचुकवर २४ सप्टेंबर रोजी लेहमध्ये झालेल्या हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा आरोप केला, ज्यामध्ये किमान चार लोक मृत्युमुखी पडले आणि जवळपास ८० जण जखमी झाले. डीजीपी यांनी सांगितले की, केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा मिळावा यासाठी उपोषणाचे नेतृत्व करणारे कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे पाकिस्तानशी संबंध आहेत का याचा तपास सुरू आहे. तसेच त्यांच्या बांगलादेश दौऱ्याबद्दलही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (एनएसए) वांगचुक यांना अटक करण्यात आली.
लेह येथे पत्रकार परिषदेत बोलताना, डीजीपी जामवाल यांनी खुलासा केला की, पोलिसांनी एका पाकिस्तानी पीआयओ (गुप्तचर अधिकारी) ला अटक केली असून हा वांगचुक यांच्या संपर्कात असल्याचा आरोप आहे. सोनम वांगचुक यांच्या पाकिस्तान संबंध आणि परदेशी निधीची चौकशी करत आहेत, असे जामवाल यांनी सांगितले. पाकिस्तानी पीआयओ याबद्दल रिपोर्टिंग करत होता. शिवाय वांगचुक हे पाकिस्तानमध्ये ‘डॉन’च्या (मीडिया हाऊस) कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे, आता एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हे ही वाचा..
बरेली दंगल प्रकरणी मौलाना तौकीर रझा अटकेत
… म्हणून काँग्रेस नेत्याला ठोठावला १.२४ अब्ज रुपयांचा दंड!
राज कुंद्रावर ईडीकडून १५० कोटींच्या बिटकॉइन घोटाळा प्रकरणी आरोपपत्र दाखल
सूरत ते बिलीमोरा बुलेट ट्रेन धावणार लवकरच
२४ सप्टेंबर रोजी लेहमध्ये झालेल्या हिंसाचारात वांगचुक यांनी हिंसाचार भडकावल्याचा आरोप जामवाल यांनी केला. या घटनेत निदर्शकांनी हिंसाचार आणि जाळपोळ करून स्थानिक भाजप कार्यालय आणि काही वाहनांना आग लावल्याने किमान चार जणांचा मृत्यू झाला आणि जवळपास ८० जण जखमी झाले. सरकारने हिंसेसाठी वांगचुक यांना जबाबदार धरले असून त्यांच्या प्रक्षोभक विधानांमुळे निदर्शकांना भडकावल्याचा आरोप केला आहे. गृह मंत्रालयाने आरोप केला आहे की वांगचुक यांनी अरब स्प्रिंग आणि नेपाळ जनरल झेड निदर्शनांचा उल्लेख केल्याने जमावाचा रोष निर्माण झाला ज्यामुळे लेहमधील स्थानिक भाजप कार्यालय आणि काही सरकारी वाहने जाळण्यात आली.







