29 C
Mumbai
Wednesday, October 7, 2026
घरक्राईमनामाचीनसाठी हेरगिरी? तैवानच्या राष्ट्राध्यक्षांच्या मुलावर पाळत ठेवणारी महिला अटकेत

चीनसाठी हेरगिरी? तैवानच्या राष्ट्राध्यक्षांच्या मुलावर पाळत ठेवणारी महिला अटकेत

एफबीआयची कारवाई

Google News Follow

Related

चीनच्या वतीने हेरगिरी केल्याच्या आरोपावरून अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (एफबीआय) कॅलिफोर्नियातील एका ३४ वर्षीय महिलेला अटक केली आहे. वानयिंग झांग उर्फ ‘हीदर’ हिच्यावर तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाई चिंग-ते यांच्या मुलावर आणि त्याच्या कुटुंबावर पाळत ठेवल्याचा आरोप आहे. लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चीनला जाणाऱ्या विमानात बसण्यापूर्वीच एफबीआयने तिला ताब्यात घेतले.

झांग ही कॅलिफोर्नियातील इर्विन येथे वास्तव्यास असून रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी तिच्यावर परदेशी सरकारची नोंदणीकृत नसलेली एजंट म्हणून काम केल्याचा आरोप ठेवला आहे. सोमवारी लॉस एंजेलिसमधील फेडरल न्यायालयात तिची प्राथमिक सुनावणी होणार आहे. अमेरिकेच्या न्याय विभागानुसार, झांग २०२५ मध्ये चिनी अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सिएटलला गेली होती. तिथे तिने तैवानच्या राष्ट्राध्यक्षांच्या मुलावर आणि त्याच्या कुटुंबावर पाळत ठेवली. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, तिने संबंधित व्यक्तींचे फोटो, व्हिडिओ तसेच वाहनांच्या नंबर प्लेटची माहिती चिनी अधिकाऱ्यांना पाठवली.

एफबीआयच्या तक्रारीनुसार, झांग आणि तिच्यासोबत असलेली आणखी एक व्यक्ती सप्टेंबर २०२५ मध्ये लास वेगासहून सिएटलला गेली होती. त्यांनी तेथे एक कार भाड्याने घेतली आणि तैवानच्या राष्ट्राध्यक्षांच्या मुलाच्या कुटुंबाशी संबंधित घराजवळ गेल्याचा आरोप आहे. शेजाऱ्याच्या सुरक्षा कॅमेऱ्यात दोघे घराबाहेर चित्रीकरण करताना दिसल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे.

तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, झांगने चिनी संपर्काला संबंधित व्यक्ती दिसल्याचे आणि त्याचे चित्रीकरण सुरू असल्याचे संदेश पाठवले. त्यासोबत वाहनांच्या दोन नंबर प्लेटची माहितीही पाठवल्याचा आरोप आहे. एफबीआयने तिच्या आयक्लाउड खात्याच्या तपासातून काही संदेश मिळवल्याचे वृत्त आहे. अमेरिकेचे सहाय्यक फेडरल अटर्नी बिल एसेली यांनी झांगने आपली कारवाई लपवण्यासाठी गुप्त पद्धतींचा वापर केल्याचा आरोप केला आहे. तसेच, ती परदेशी सरकारसाठी काम करत असल्याची माहिती अमेरिकन सरकारला दिली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

रशियात ‘प्लेग’ची भीती? लॅब संशोधकाच्या मृत्यूनंतर २०० जण क्वारंटाइन

भारतीय सैन्य ठरले संकटमोचक; व्हिएतनामी नागरिकाची सुखरूप सुटका

भारत संकटात असताना रशिया पाठीशी!

इस्रायलला जाणाऱ्या फ्लाइटसाठीच फ्लायदुबईची निवड!

या प्रकरणावर तैवानच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या घटनेला ‘सीमापार दडपशाही’चे उदाहरण असल्याचे तैवानने म्हटले असून, अमेरिकेने तैवानच्या नागरिकांचे संरक्षण केल्याबद्दल आभार मानले आहेत. दरम्यान, चीनच्या दूतावासाकडून या आरोपांवर तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा