30 C
Mumbai
Tuesday, March 31, 2026
घरक्राईमनामासीतापुरमध्ये विद्यार्थ्यांकडून बळजबरीने “आय लव्ह मोहम्मद” लिहून घेतले

सीतापुरमध्ये विद्यार्थ्यांकडून बळजबरीने “आय लव्ह मोहम्मद” लिहून घेतले

शाळेच्या संचालकासह एका शिक्षकाला अटक

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशमधून वारंवार “आय लव्ह मोहम्मद” संबंधित घटना उघडकीस येत आहेत. कानपूर आणि बरेलीनंतर आता सीतापुरमधून अशीच एक घटना समोर आली आहे. खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांकडून बळजबरीने “आय लव्ह मोहम्मद” लिहून घेतल्याचा आरोप आहे. विद्यार्थ्यांनी पालकांना ही बाब सांगितल्यावर हे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात शाळेच्या संचालकासह एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. आणखी एका आरोपीचा शोध घेतला जात आहे.

सीतापूरमधील खाजगी शाळा असलेल्या अमर बापू शिक्षा निकेतनमध्ये संबंधित घटना घडली. या शाळेवर कला स्पर्धेच्या बहाण्याने लहान हिंदू मुलांना “आय लव्ह मोहम्मद” लिहिण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. जेव्हा मुलांनी घरी येऊन त्यांच्या पालकांना या घटनेबद्दल सांगितले तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले आणि परिसरात तणाव वाढला. सीतापूर पोलिसांनी कारवाई करत शाळेचा संचालक शौकत अन्सारी आणि एका शिक्षकाला अटक केली आहे. दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

विद्यार्थ्यांनी सांगितले की, त्यांच्या शिक्षकाने त्यांना “आय लव्ह मोहम्मद” लिहिण्यासाठी गृहपाठ दिला होता. तसेच गृहपाठ न लिहिल्यास शिक्षेची धमकी दिली होती. या भीतीने सर्व मुलांनी गृहपाठ पूर्ण केला. मुलांच्या म्हणण्यानुसार, शिक्षकाने त्यांना असेही सांगितले की “अल्लाह आणि देव एकच आहेत; कोणताही फरक नाही.” या घटनेमुळे पालक संतापले आहेत आणि ते शाळेवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत आहेत.

हे ही वाचा:

पीओकेमध्ये पाक सरकार विरोधात निदर्शने

५० हून अधिक हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्याला लखनौमधून ठोकल्या बेड्या

सूर्यकुमार यादवकडून स्पर्धेचे मानधन पहलगाम पीडितांच्या कुटुंबियांना आणि सैन्याला

आशिया कप ट्रॉफी, भारतीय खेळाडूंची पदके हरलेल्या पाकने चोरली!

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शाळेबाहेर पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, दोघांना अटक करण्यात आली आहे आणि फरार संशयिताचा शोध सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
300,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा