25 C
Mumbai
Tuesday, January 27, 2026
घरक्राईमनामाबेंगळुरूस्थित सीईओ महिलेने आपल्या मुलाला मारून टाकत आत्महत्येचा केला प्रयत्न

बेंगळुरूस्थित सीईओ महिलेने आपल्या मुलाला मारून टाकत आत्महत्येचा केला प्रयत्न

गोव्याहून बेंगळुरूला पळून जाताना पोलिसांनी केली अटक

Google News Follow

Related

बेंगळूरूतील एका कंपनीच्या सीईओ महिलेने आपल्या लहानग्या मुलाची हत्या करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. डाव्या मनगटावर जखम करत तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.माइन्डफुल अल लॅबची सीईओ असलेल्या या महिलेचे नाव सुचाना सेठ असे आहे.

गोव्यात ही घटना घडली. आत्महत्येचा प्रयत्न फसल्यावर तिने मुलाचा मृतदेह बॅगेत भरून ती बेंगळुरूला निघाली. त्यासाठी तिने विमानाचा मार्ग न पत्करता त्यासाठी टूरिस्ट कॅब केली. त्यासाठी तिला ३० हजार रुपये द्यावे लागले.

हे ही वाचा:

विदेशात नोकरीचे अमिष दाखवून करीत होते फसवणूक

राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पदभार स्वीकारला

मालदीववरून शरद पवार मोदींच्या पाठीशी!

झारखंडमध्ये अज्ञातांकडून मंदिरातील मूर्तींची तोडफोड!

 

कर्नाटकच्या चित्रदूर्ग येथे या महिलेला अटक करण्यात आली. गोव्यात ज्याठिकाणी ती राहत होती, तिथे कर्मचाऱ्यांना खोलीत रक्ताचे डाग आढळले. त्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी लागलीच पोलिसांना कळवले. तेव्हा पोलिसांनी सेठ यांच्या चालकाला फोन करून त्याला जवळच्या पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले. तिथे त्या महिलेला अटक करण्यात आली. तपासणी केल्यावर तिच्या जवळ असलेल्या बॅगेत मुलाचा मृतदेह आढळला.

त्या खोलीत जे रक्ताचे डाग सापडले ते सुचाना सेठ या महिलेने आत्महत्या करण्याच्या प्रयत्नामुळे पडले होते.

सेठने भौतिकशास्त्रात मास्टर्स पदवी मिळविली होती. संस्कृतमध्ये तिने अव्वल क्रमांकही मिळविला होता.  पोलिसांनी आता अटक केल्यावर तिला ६ दिवसांची कोठडी दिली आहे. सेठ ही पश्चिम बंगालमधील असून बेंगळुरू येथे स्थायिक आहे. पण आपल्या पतीशी घटस्फोट घेतल्यानंतर त्याला मुलाला भेटू द्यायचे नसल्यामुळे तिने हे पाऊल उचलले. सध्या या दोघांच्या घटस्फोटाचे प्रक्रिया सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा