28.2 C
Mumbai
Wednesday, August 5, 2026
घरक्राईमनामाबंगालचे मुख्यमंत्री शुभेंदूच्या घराची टेहळणी

बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदूच्या घराची टेहळणी

पाकिस्तानी दहशतवादी कटाचा धक्कादायक खुलासा

Google News Follow

Related

पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (JeM) शी संबंधित असल्याचा संशय असलेल्या एका संशयिताने पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या कोलकात्यातील अधिकृत निवासस्थानाची टेहळणी केल्याचा आणि त्यांच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवल्याचा धक्कादायक खुलासा तपासात झाला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पश्चिम बंगालच्या स्पेशल टास्क फोर्सने (STF) ही माहिती दिली असून, या खुलाशानंतर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

एसटीएफने अटक केलेल्या हमीम मंडल या संशयिताची चौकशी सुरू असताना हा महत्त्वाचा तपशील समोर आला. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानस्थित हँडलर्सच्या सूचनेनुसार हमीमने कोलकात्यातील चिनार पार्क परिसराची अनेकदा पाहणी केली. याच परिसरात मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचे अधिकृत निवासस्थान आहे. त्याने केवळ निवासस्थानाचीच नव्हे, तर मुख्यमंत्र्यांच्या येण्या-जाण्याचे मार्ग, सार्वजनिक कार्यक्रम आणि सुरक्षा व्यवस्थेचीही माहिती गोळा केल्याचा संशय आहे.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार एखाद्या स्वतंत्र व्यक्तीचा नसून पाकिस्तानमधून नियंत्रित केल्या जाणाऱ्या मोठ्या दहशतवादी कटाचा भाग असू शकतो. हमीम मंडल पाकिस्तानातील आपल्या हँडलर्सच्या संपर्कात होता आणि त्यांना नियमित माहिती पाठवत होता, असा एसटीएफचा दावा आहे. या प्रकरणात आर्थिक व्यवहार, संपर्काचे माध्यम आणि इतर सहकाऱ्यांचाही तपास सुरू आहे.

यापूर्वी एसटीएफने दावा केला होता की, हमीम मंडल आणि त्याच्या साथीदारांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनात पोलीस गणवेश परिधान करून घातपात घडवून आणण्याचाही कट रचला होता. या कटाचा आणि मुख्यमंत्र्यांच्या हालचालींवर ठेवलेल्या नजरेचा परस्पर संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे.

या प्रकरणात हमीम मंडलसह त्याच्या काही सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्याची महिला सहकारी तसेच स्थानिक स्तरावर मदत करणाऱ्या इतर संशयितांनाही एसटीएफने ताब्यात घेतले असून, या नेटवर्कचा विस्तार किती मोठा आहे, याचा शोध घेतला जात आहे. तपासात सोशल मीडिया, ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म आणि एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅप्सद्वारे संपर्क साधला जात असल्याचेही समोर आले आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानसे गिरे, खजूर भारत मे अटके…किंमत ३ कोटी

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा धोका, पोस्टमुळे पोलिस सतर्क

मेहबुबा मुफ्तींनी धरला तिरंगा उलटा

ई-२० वादातील गडकरींशी संबंधित डीपफेक, बनावट पोस्ट हटवा

या खुलाशानंतर मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या निवासस्थानासह संवेदनशील ठिकाणांवरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. तपास यंत्रणा या कटामागील संपूर्ण दहशतवादी नेटवर्क उघड करण्यासाठी विविध राज्यांतील सुरक्षा संस्थांशी समन्वय साधत असून, पाकिस्तानशी असलेल्या कथित संबंधांचीही सखोल चौकशी सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
325,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा