झारखंडची राजधानी रांची येथून एका संशयित आयसिस दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली स्पेशल सेलची टीम बऱ्याच काळापासून या संशयित दहशतवाद्याचा शोध घेत होती. आता दिल्लीच्या स्पेशल सेल, झारखंड एटीएस, रांची पोलिसांच्या संयुक्त कारवाईत संशयित व्यक्तीला रांची येथून अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयित आयसिस दहशतवाद्याचे नाव अशर दानिश आहे. त्याला रांचीतील इस्लामनगर येथून अटक करण्यात आली. अशर दानिश हा बोकारो जिल्ह्यातील पेटवार येथील रहिवासी आहे. दिल्लीत दाखल झालेल्या गुन्ह्याच्या आधारे दिल्ली स्पेशल सेलची टीम त्याचा शोध घेत होती. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित दहशतवाद्याची चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देशातील विविध राज्यांमध्ये १२ हून अधिक ठिकाणी स्पेशल सेल आणि केंद्रीय एजन्सींचे छापे सुरू आहेत. दिल्लीतूनही एका आयसिस दहशतवाद्यालाही अटक करण्यात आली आहे. दिल्लीतून अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव आफताब आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ८ हून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
हे ही वाचा :
नेव्ही नगरातून इन्सास रायफल चोरलेले दोघे भाऊ तेलंगणातून अटकेत
ट्रम्प म्हणतात, प्रिय मित्र मोदींशी बोलायची इच्छा; पंतप्रधान मोदी काय म्हणाले?







