32 C
Mumbai
Monday, December 8, 2025
घरक्राईमनामाचारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला औषधातून गिळायला लावले ब्लेडचे तुकडे!

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला औषधातून गिळायला लावले ब्लेडचे तुकडे!

पुण्यातील घटना

Google News Follow

Related

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन इसमाने त्याच्या पत्नीला औषधांच्या गोळ्यांमधून ब्लेडचे तुकडे गिळायला लावण्याची धक्कादायक घटना घडली आहे.पती-पत्नीच्या नात्यास काळिमा फासणारी घटना पुण्यामध्ये घडली आहे.या घटनेने पुणे शहर हादरलं आहे.

संशयाचं खूळ डोक्यात गेलं की माणूस काहीही करतो.तसाच प्रकार पुण्यातील उत्तमनगरमध्ये घडला आहे.पत्नीवर संशय घेऊन पतीने चक्क ब्लेडचे तुकडे गिळायला लावले.या प्रकरणी ४१ वर्षीय पीडित महिलेने आपल्या पतीविरुद्ध उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी सोमनाथ सपकाळ (४५) याला अटक केली आहे.मात्र, अशा विचित्र प्रकारामुळे भागात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,हा संशयाचा प्रकार ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होता.गेल्या दोन महिन्यांपासून आरोपी सोमनाथ सपकाळ आणि त्याच्या पत्नीमध्ये वादविवाद सुरु होता.सोमनाथ आपल्या पत्नीवर अनेक वेळा संशय घ्यायचा.यावरून दोघांमध्ये भांडणेही झाली.सोमनाथ आपल्या पत्नीला शिवीगाळ गाळ करत मारहाणही करायचा.मागील काही दिवसांपूर्वी सोमनाथ आपल्या भावासोबत दारू पिण्यास बसला होता.त्यावेळी संशयावरून पुन्हा दोघात वाद झाला होता.त्यानंतर सोमनाथने आपल्या पत्नीचा काटा काढण्याचा विचार केला.

हे ही वाचा:

उत्तरकाशी बोगद्यातील कामगारांच्या बचावासाठी दिल्लीहून आले ‘ऑगर ड्रिलिंग मशीन’!

शेहला रशीद म्हणते, काश्मीर म्हणजे गाझा नाही, श्रेय मोदी, शहांचे!

ऐश्वर्या रायबाबत वादग्रस्त विधान; पाकिस्तानी क्रिकेटपटू अब्दुल रझ्झाककडून माफी!

न्यूजक्लिक प्रकरणी अमेरिकन उद्योजक नेव्हिल रॉय सिंघमला समन्स

झालेल्या वादामुळे सोमनाथने त्याच्या पत्नीची हत्या करण्याचा कट रचला.तशी योजनाही आखली.त्यानुसार त्याने आपल्या पत्नीस नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कॅल्शिअमच्या कॅप्सूल्स खाण्यासाठी दिल्या.खायला दिलेल्या कॅल्शिअम कॅप्सूलमध्ये सोमनाथने ब्लेडचे तुकडे टाकले होते.त्या गोळ्या आपल्या पत्नीस खायला दिल्या.कॅल्शिअमच्या गोळ्या खाताच पत्नीला ब्लेडचे तुकडे तोंडात टोचू लागले.त्यामुळे पत्नीच्या तोंडातून रक्तही येऊ लागले.पत्नीने गोळ्या तोंडातून थुंकून टाकण्याचा प्रयत्न केला पण क्रूर सोमनाथने पत्नीचे न ऐकता तिला तुकडे तसेच गिळायला लावले.

त्यामध्ये पीडित महिलेच्या गळ्यात गंभीर जखमाही झाल्या. पत्नीने वैद्यकीय तपासणी केली असता हा सगळा प्रकार समोर आला. अखेर नवऱ्याच्या जाचाला कंटाळून पत्नीने पतीविरोधात तक्रार दाखल केली.त्यानंतर उत्तमनगर पोलिसांनी आरोपी सोमनाथ याला अटक करत तुरूंगात टाकले. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा