25 C
Mumbai
Wednesday, February 18, 2026
घरक्राईमनामाबांगलादेशात हिंदू कामगाराची हात-पाय बांधून हत्या

बांगलादेशात हिंदू कामगाराची हात-पाय बांधून हत्या

चहाच्या मळ्यात करत होता काम

Google News Follow

Related

बांगलादेशात वारंवार अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात असून विशेषतः हिंदुंवर हल्ले केले जात आहेत. आतापर्यंत घडलेल्या अनेक घटनांमध्ये हिंदूंचा बळी गेला आहे. अशातच आणखी एक हिंदू व्यक्तीची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी (११ फेब्रुवारी) ईशान्य बांगलादेशातील मौलवीबाजार भागात एका २८ वर्षीय हिंदू पुरूषाचा मृतदेह आढळला. यानंतर खळबळ उडाली आहे.

चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या पीडितेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. तसेच त्याचे हात आणि पाय दोरीने बांधलेले होते. वृत्तानुसार, पोलिसांना ढाक्यापासून सुमारे २०० किमी ईशान्येकडील चहाच्या बागेत पीडित रतन शुभो कार याचा मृतदेह आढळला. कमलगंज पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अब्दुल अवल यांनी पुष्टी केल्यानुसार, रतन शुभो कार इस्लामपूर युनियन अंतर्गत चंपारण चहाच्या बागेत काम करत होते.

सकाळी १० वाजण्याच्या सुमारास स्थानिकांना रतनचा मृतदेह पहिल्यांदा दिसला. मृतदेहावर जखमांच्या खुणा होत्या. रतनचा मोठा भाऊ लक्ष्मण कर यांनी सांगितले की, कुटुंब त्याचा शोध घेत होते. बुधवारी सकाळी कळले की, रतन यांचा मृतदेह बागेत पडला आहे. घटनास्थळी जाऊन रतन याची ओळख पटवल्याचे त्याच्या भावाने सांगितले. तसेच त्याची हत्या का करण्यात आली याचे कारण माहिती नसल्याचेही लक्ष्मण म्हणाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी मौलवीबाजार सदर रुग्णालयात पाठवण्यात आला.

हे ही वाचा:

३० कोटींच्या फसवणूक प्रकरणात चित्रपट दिग्दर्शक विक्रम भट्टसह पत्नीला सशर्त जामीन

आता पंतप्रधान कार्यालय नाही, सेवा तीर्थ…

अमेरिकेचा सर्वात मोठे विमानवाहू जहाज इराणकडे रवाना

सोने व चांदीच्या किंमतीत थोडी वाढ

काही दिवसांपूर्वीच मैमनसिंगमध्ये एका तांदूळ व्यापाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. साउथ एशिया फोरम फॉर फ्रीडम ऑफ रिलिजन बिलिफने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेशमध्ये गेल्या ४५ दिवसांत हिंदूंच्या किमान १५ लक्ष्यित हत्या झाल्या आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
292,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा