26 C
Mumbai
Sunday, March 1, 2026
घरक्राईमनामाशिक्षिकेचे तक्रारीकडे दुर्लक्ष आणि नऊ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; नेमकं प्रकरण काय?

शिक्षिकेचे तक्रारीकडे दुर्लक्ष आणि नऊ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; नेमकं प्रकरण काय?

जयपूरमधील धक्कादायक घटना

Google News Follow

Related

राजस्थानच्या जयपूरमधील एका खाजगी शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून नऊ वर्षांच्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पीडित नऊ वर्षांच्या मुलीच्या पालकांनी शिक्षिकेवर आरोप केला आहे की, घटनेच्या दिवशीही मुलीच्या वर्गमित्रांकडून तिला त्रास दिला जात असतानाच आणि याची वारंवार तक्रार करूनही संबंधित शिक्षिकेने दुर्लक्ष केले. त्यांनी आरोप केला की, त्यांच्या मुलीने तिच्या वर्गातील काही मुलांनी तिला त्रास दिल्याची तक्रार करण्यासाठी किमान चार वेळा शिक्षिकेकडे संपर्क साधला होता आणि पालकांनीही स्वतः याआधीही शाळेकडे हा मुद्दा उपस्थित केला होता.

“मुलीने वर्गात छळ होत असल्याबद्दल माझ्याकडे अनेक वेळा तक्रार केली होती. काही मुले तिचा अपमान करायचे आणि तिचे नाव दुसऱ्या मुलाशी जोडून तिची छेड काढायचे. मी या प्रकरणाबाबत शिक्षिकेशी संपर्क साधला होता, पण ती खूपच असंवेदनशील होती,” असे मुलीची आई शिवानी यांनी सांगितले.

१ नोव्हेंबर रोजी, नऊ वर्षांच्या अमायराने नीरजा मोदी शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले परंतु रुग्णालयात पोहचताच तिला मृत घोषित करण्यात आले. ही दुःखद घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती, ज्यामध्ये ती उडी मारण्यापूर्वी रेलिंगवर चढताना दिसत होती. मुलीच्या आईच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षीपासून तिला त्रास दिला जात होता आणि या वर्षीही तोच प्रकार सुरू राहिला कारण तिच्या वर्गात तेच विद्यार्थी पुन्हा आले. त्यांनी पुढे म्हटले की, गेल्या वर्षी मी एक- दोनदा तक्रार केली होती. मी मुख्याध्यापिका इंदू मॅडम यांनाही वर्गात अमायरासोबत काय घडत आहे याबद्दल सांगितले होते.

मुलीचे काका साहिल म्हणाले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले आहे की घटनेच्या दिवशी अमायरा तिच्या शिक्षिकेकडे वारंवार येत असताना काही मुले तिला त्रास देत होती. पोलिसांनी आम्हाला दाखवलेल्या फुटेजमध्ये, घटनेच्या सुमारे एक तास आधी, अमायरा तिच्या जागेवरून चार ते पाच वेळा उठली, तिच्या वर्गशिक्षिकेकडे गेली, काहीतरी बोलली आणि परत आली. ती वारंवार तक्रार करत असल्याचे स्पष्ट होते. तिच्या वर्गमित्रानेही पुष्टी केली की, ती शिक्षिकेला सांगत होती की इतर मुले तिला त्रास देत आहेत. फुटेजमध्ये समोर बसलेले विद्यार्थी मागे वळून तिची छेड काढतानाही दिसत आहेत, असे त्यांनी पुढे सांगितले.

हे ही वाचा:

आशिया कप ट्रॉफीचा मुद्दा सोडवण्यासाठी आयसीसीकडून समिती स्थापन

पश्चिम आफ्रिकन देश असलेल्या मालीमध्ये पाच भारतीय नागरिकांचे अपहरण

डोनाल्ड ट्रम्प जी-२० परिषदेत सहभागी होणार नाहीत! कारण आले समोर

तेजस विमानांसाठी ११३ इंजिन खरेदीचा भारत- अमेरिकेमध्ये करार

शिक्षिकेने नंतर कबूल केले की, अमायरा तिच्याकडे दोनदा आली होती. एकदा म्हणाली की विद्यार्थी वाईट शब्द वापरत आहेत आणि दुसऱ्यांदा म्हणाली की ते माझ्या अभ्यासात मला त्रास देत आहेत. शिक्षिकेने तिला फक्त सांगितले, जा जाऊन बस, अशी माहिती समोर आली आहे. घटनेला जवळजवळ एक आठवडा उलटूनही, शाळेच्या अधिकाऱ्यांनी अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. कुटुंबाने शाळेवर सहकार्य न करण्याचा आरोप केला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा