26 C
Mumbai
Wednesday, December 10, 2025
घरक्राईमनामापोलिसांना सापडला 'मोरावर चोर', तेलंगणातील यूट्युबरला अटक !

पोलिसांना सापडला ‘मोरावर चोर’, तेलंगणातील यूट्युबरला अटक !

गुन्हा दाखल

Google News Follow

Related

तेलंगणातील सिरसिल्ला जिल्ह्यातील एका युट्युबरने त्याच्या चॅनलवर ‘मोराची करी’ बनवतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. शनिवारी अपलोड केलेल्या या व्हिडिओमध्ये त्याने पारंपरिक पद्धतीने मोराची करी कशी बनवायची हे सांगितले होते. हा व्हिडिओ सोशल मोडियावर अपलोड होताच अनेकांनी जोरदार विरोधक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आणि व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी अखेर कारवाई करत त्याला रविवारी (११ ऑगस्ट) अटक केली आहे.

कोडम प्रणयकुमार असे या यूट्यूबरचे नाव आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्राणी हक्क कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली. अशा व्हिडीओच्या माध्यमातून राष्ट्रीय पक्ष्याची बेकायदेशीरपणे हत्या केली जात आहे हे उघड होत असल्याचे प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी म्हटले. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे आणि असे लोक राष्ट्रीय पक्षाची हत्या करत आहेत. अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी अनेकांनी केली. दरम्यान, वादानंतर हा व्हिडिओ कुमारच्या यूट्यूब चॅनलवरून काढून टाकण्यात आला. वनविभाग पोलिसांनी कारवाई करत यूट्यूबर कोडम प्रणयकुमारला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. वनविभागाकडून त्या जागेची पाहणी करण्यात आली आहे, ज्याठिकाणी ‘मोराची करी’ बनवण्यात आली होती.

सिरसिल्लाचे पोलीस अधीक्षक (एसपी) अखिल महाजन यांनी सांगितले की, कोडम प्रणयकुमारवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यामध्ये त्याच्यासह इतर जे सहभागी असतील त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. यूट्यूबरच्या रक्ताचे नमुने आणि घटनास्थळावरून जमा करण्यात आलेल्या करीचे काही भाग चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. चाचणीमध्ये मोराच्या मांसाचे सेवन केल्याचे आढळून आल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा :

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरला अटकेपासून दिलासा

रामलला झाले अब्जाधीश, भाविकांनी अर्पण केले ५५ अब्ज रुपये !

हिंडेनबर्गच्या आरोपांनंतर अदानी समूहाचे शेअर्स सात टक्क्यांनी कोसळले

फारुख अब्दुल्ला बरळले, म्हणे सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये संगनमत

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या प्रणयकुमारचे यूट्यूबवर ‘श्री टीवी’ नावाचे चॅनेल आहे. यावर त्याने हा मोराच्या करीचा व्हिडिओ अपलोड केला होता. यापूर्वी त्याने आणखी एक वादग्रस्त व्हिडिओ केला होता, ज्यामध्ये तो रानडुकरांची करी बनवत आहे. हा व्हिडीओ आता हटवण्यात आला असला तरी पोलिस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपास करण्याची मागणी प्राणी हक्क कार्यकर्त्यांकडून होत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा