25 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरक्राईमनामादिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांत मुंबईतला जान मोहम्मद

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांत मुंबईतला जान मोहम्मद

Google News Follow

Related

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ६ दहशतवाद्यांना अटक केली असून त्यात जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया हा मुंबईतील सायन येथे कुटुंबियांसह राहणारा असल्याचे आढळले आहे.

मुंबईतून राजस्थान येथे पळून गेल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने त्याला कोटा येथून अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकातील काही अधिकारी मंगळवारी दुपारी जान मोहम्मदच्या घरी चौकशीसाठी येऊन गेल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे.

जान मोहम्मद उर्फ समीर कालिया अली मोहम्मद शेख (४७) हा मुंबईतील सायन पश्चिम एम जी रोडवरील केलाबखार येथील सोशल नगर येथे कुटुंबियांसह राहण्यास होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उत्तर प्रदेशातील विविध शहरातून त्याच्या सहकाऱ्यांना अटक केल्यानंतर जान मोहम्मद हा मुंबईतून राजस्थान येथे पळून गेला होता आणि कोटा येथे लपून बसला होता.

दिल्लीच्या विशेष पथकाने त्याला कोटा येथून अटक केली आहे. जान मोहम्मद उर्फ समीर कालिया हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिश इब्राहिम यांच्या थेट संपर्कात होता. समीरला पाकिस्तानात लपलेल्या अंडरवर्ल्ड ऑपरेटिव्हशी संबंधित एका पाक-आधारित व्यक्तीने आयईडी, अत्याधुनिक शस्त्रे आणि ग्रेनेड भारतातील विविध घटकांपर्यंत सहजपणे पोहोचवण्याचे काम सोपवले होते. पाक-आयएसआयच्या सूचनेनुसार काम करणारे पाकिस्तान प्रशिक्षित दहशतवादी असलेल्या ओसामा आणि जीशान यांना आयईडी ठेवण्यासाठी दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या योग्य ठिकाणांची तपासणी करण्याचे काम सोपवण्यात आले होते.

हे ही वाचा:

‘जेट’ पुढील वर्षी हवेत झेपावणार

प्रसिद्ध चित्रकार देविदास पेशवे यांचे निधन

…या कारखान्यात सगळी कामे सांभाळत आहेत फक्त महिला

साहेब…गर्लफ्रेंड मिळत नाही! राजूराच्या मज्नूचे काँग्रेस आमदाराला पत्र

जान मोहम्मद याला स्लीपर सेल ऑपरेटिव्हकडून अत्याधुनिक आरडिएक्स, आयईडी , ग्रेनेड, पिस्तूल आणि काडतुसे मिळाली होती आणि ती त्याने सुरक्षित लपविण्यासाठी उत्तर प्रदेशला पाठवण्यात आल्याचे चौकशीत उघड झाले आहे. तेच सामान दिल्ली आणि मुंबई आणि देशाच्या इतर भागातील इतर दहशतवाद्यांना सोपवले जाणार होते.

त्यानंतर, आयईडीच्या आणि इतर सामानाची  पुढील डिलिव्हरी त्याच चॅनेलद्वारे केली जाणार होती, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या विशष पथकाच्या अधिकारी यांनी दिली आहे. जान मोहम्मद उर्फ समीर कालिया हा अनिस इब्राहिम आणि दहशतवादि संघटनेतील महत्चाचा दुवा असल्याचे समजते.

जान मोहम्मद शेखबाबत आणखी माहिती मिळवण्यासाठी तसेच पुरावे गोळा करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे विशेष पथकातील काही अधिकारी मंगळवारी मुंबईत दाखल झाले होते. त्यांनी जान मोहम्मद याचे कुटुंब राहत असलेल्या सायन येथील केलाबखार,  सोशल नगर येथे राहणाऱ्या ठिकाणी येऊन कटुंबीयाकडे या अधिकाऱ्यांनी चौकशी करून काही महत्वाचे पुरावे सोबत घेऊन गेले असल्याची माहिती समोर आली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा